अ. जमिनीनुसार वार्षिक तणे – आघाडा, कुर्डू, रब्बीतणे – वसंतवेल, रानपैजी उन्हाळीतणे द्वैवार्षिक तणे – राणगाजर, राणकांदा बहुवार्षिक तणे – हरळी, लव्हाळा, कुंदा, रुई, घाणेरी ब. ज्या ठिकाणी आढळतात त्यानुसार पिकामधील तणे – टारफुला, रानओट, पाखड, बंबाखू, खंडकुळी, माठ, काटेमाठ, ओसाडी, तादुंळजा पडीक जमिनीतील तणे – रानबाभूळ, रानबोर, रुई कुरणातील तणे – गाजर गवत, पिवळी तिळवण कालवा, पाण्याचे पाट, डबके - लव्हाळा, माका, पाणकुंभी. रस्त्याच्या कडेला रेल्वेमार्ग – गाजरगवत, रूई टाकळा क. जमीन प्रकारानुसार हलक्या जमिनीतील तणे – आघाडा, चिमनचारा, कुर्डू, सराटा, गोखरु, बरबडाव जोंधळी भारी जमिनीतील तणे – लव्हाळा, हरळी, कुंदा पाणथर तणे – पाणकणीस, लव्हाळा ड. पानाच्या रुंदीनुसार व बियाच्या दलानुसार एकदल तणे – अरुंद पानाची तणे, फांद्या नसलेली तणे, उदा. गवत चिमनतारा, हरळी द्विदल तणे – रुंद पानाची तसेच फांद्या असलेली तणे उदा. दुधनी, कांगाणी कई.