Posts

Showing posts from November 28, 2019

महात्मा ज्योतिबा फुले

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन......... क्रांतीज्योत महात्मा फुले ह्यांचा २८ नोव्हेंबर हा महानिर्वाण दिवस. जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्यांचा कैवारी म्हणजे महात्मा फुले. ह्या स्वाभिमानी नेत्याने देशाच्या सामाजिक जीवनात अशी काय उलथापालथ घडवली कि त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागली.त्याग,आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रतिष्ठा, सामाजिक व आर्थिक न्याय, शोषणविरहित समाजरचना, समान संधी या महान नैतिक मूल्यांवर आधारित समाजरचनेचे स्वप्न पाहिलेल्या आणि त्यासाठी आयुष्यभर संघर्ष केलेल्या महात्मा फुले यांचा आज १२९ वा स्मृती दिन “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” महिला शिक्षणाचे पुरस्कर्ते, सार्वजनिक सत्यधर्माचे व सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले. बहुजन समाजाला सामाजिक हक्क मिळून देण्यात त्यांनी आपले आयुष्य वेचले. गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, सार्वजनिक सत्य , अशा अनेक पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जनजागृ...