Posts

Showing posts from April 16, 2019

तुरटीचे गुणधर्म

Image
बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल’ साधारण २०ग्रॅम साबणाची किंमत ४०० रुबेल म्हणजे ८०० रुपये होती आयुर्वेद ही भारताची एक ओळख! संपूर्ण जगाकडे जे नाही ते भारताकडे आहे. ते ज्ञान म्हणजे आयुर्वेद. त्यामुळे हे शिकण्यासाठी ज्याप्रमाणे जगभरातून लोक आज भारताकडे येत आहेत, त्याचप्रमाणे कित्येक वैद्य वेगवेगळ्या देशांमध्ये आयुर्वेद प्रचार कार्यासाठी जात आहेत. त्यांना सर्व प्रगत देशांकडून आग्रहाचे निमंत्रण मिळत आहे. मलासुद्धा गेली ७-८ वर्षे रशियामध्ये आयुर्वेद शिकविण्यासाठी जायची संधी मिळाली. मात्र प्रत्येक वेळी मीच काही तरी शिकून येतोय की काय असे मला वाटते. कारण आपण जेवढा आयुर्वेद वापरत नाही त्यापेक्षा थोडा जास्त आपलाच आयुर्वेद रोजच्या वापरात वापरणारे लोक मला तिथे भेटले. एकदा एका रुग्णाशी सहज गप्पा मारत बसलो होतो तर तो मला तो रोज वापरत असलेल्या भारतीय बाजारपेठेतील काही आयुर्वेदिक वस्तूंची माहिती सांगायला लागला. आयुर्वेदिक टूथपेस्ट, साबण, तेल असे सांगून झाल्यावर तो मला म्हणाला की तुमचा तो ‘नॅचरल क्रिस्टल सोप तर फारच छान आहे. रशियन भाषेत नॅचरल चा उच्चार ‘नतुराल’ असा करतात त्यांच्या भाषेत ऐकायला फार...