ओळख औषधी वनस्पतींची - काडेचिराईत - शास्त्रीय नाव - ॲडोग्राफिस पॅनिकुलाटा (Andrographis paniculata) - वनस्पती परिचय - ही एक झुडूपवर्गीय लहान क्षुप स्वरूपाची वनस्पती आहे. हे क्षुप ३० ते ६० सें.मी. उंच वाढते. त्याचे खोड चौकोनी असून, पाने भाल्यासारखी टोकदार व हिरवी २ सें.मी. लांबीची असतात. तसेच पिकलेल्या पानांचा रंगही किंचित काळपट असतो. - फुले -फुले मंजिरी व गुलाबी रंगाची असतात. - फळे - फळे बोंडवर्गीय असून, १.५ ते २ सें.मी. लांबीच्या चपट्या शेंगेसारखी असतात. शेंगा पक्व झाल्यावर, काळपट तपकिरी रंगाच्या असतात. - बिया - शेंगेमधील बी पिवळट करडे असून, मोहरीपेक्षा लहान असते. - सर्व पंचांग अतिशय कडू असतो. भारतात काडेचिराईतच्या १९ प्रजाती आहेत. त्यापैकी पॅनिक्युलेटा ही प्रजाती औषधीदृष्ट्या महत्त्वाची आहे. - औषधी भाग - पंचाग (संपूर्ण वनस्पती) औषधी गुणधर्म - - या झाडाच्या कोवळ्या पानांचा काढा लहान मुलांच्या हगवणीवर उत्तम आहे. - सध्या या वनस्पतीच्या पाल्य...