Posts

Showing posts from October 6, 2026

माझ्या नजरेतून 06 स्वातंत्र्य की फक्त परवानगी?

Image
स्वातंत्र्य की फक्त परवानगी? आजच्या स्त्रीपुढील एक अस्वस्थ करणारा प्रश्न             आजची स्त्री शिकते, नोकरी करते, व्यवसाय करते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते. देश-परदेशात तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आपण अभिमानाने म्हणतो, "आजची स्त्री स्वतंत्र आहे." पण थोडा खोलवर विचार केला तर एक अस्वस्थ करणारा प्रश्न समोर येतो— स्त्रीला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे, की फक्त स्वातंत्र्यासारखी दिसणारी एक 'परवानगी'? कारण "तू जाऊ शकतेस" आणि "तुला कुठे जायचंय ते तू ठरव" ... या दोन वाक्यांमध्ये स्वातंत्र्याचा खूप मोठा फरक लपलेला आहे. उंबरठ्याबाहेरचे पाऊल आणि जबाबदाऱ्यांचे ओझे आज स्त्री घराचा उंबरठा ओलांडू शकते, पण घरच्या जबाबदाऱ्यांचं ओझं उंबरठ्याबाहेर ठेवू शकत नाही. तिला नोकरी करण्याची परवानगी आहे, पण घराची संपूर्ण जबाबदारी अजूनही तिचीच मानली जाते. ती मैत्रिणींसोबत बाहेर जाऊ शकते, पण "किती वाजता येशील?" या प्रश्नाचं उत्तर तिला द्यावंच लागतं. ती स्वतःचे पैसे कमवू शकते, पण ते स्वतःवर खर्च करताना अजूनही तिला विचार करावा लागतो. ती तिचं मत मांडू शकते, पण त...