Posts

Showing posts from May 23, 2016

पत्र

पत्र “ तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय ? “ “ अवो ,काई न्हाई ,चुलीच्या धुरानं पाणी आलंय जरा, अन तुमच्या डोळ्यात का पाणी आलंय ?” “अगं ,वावधान उठलं न फुफाटा डोळ्यात गेलाय बघ " दोघांनी एकमेकांना खोटंच सांगितलेलं. तालुक्याला शिकणाऱ्या पोराचं पत्र आलेलं. खुशाली कळवली ,अभ्यास नीट करतोय म्हणून सांगितलं त्याचा दोघांना आनंद झालेला. पत्र आलेलं डालडाच्या पत्र्याच्या डब्यात, भाकरीच्या रिकाम्या फडक्याखाली ठेवलेलं. त्याला भाकरीचा,लोणच्याचा गंध लागलेला. काल सकाळी आईनं पाठवलेल्या भाकरीच्या खाली डब्याच्या तळाला वडिलांनी लिहिलेलं पत्र वाचून पोराच्या डोळ्यातून पाणी आलेलं. " पाऊस बराय,गहू काढणीला आलाय ,गाईला कालवड झालीय तिचा खरवस पाठवलाय तुझ्या आईनं ,तुझ्या मित्रांना पण दे ,बाकी खुशाल ,सुट्टीत आल्यावर बोलू ,काळजी घ्या " घरच्या जुन्या वहीच्या चतकोर पानावर सातवी पास वडिलांनी लिहिलेलं पत्र.पेनाची कांडी संपली म्हणून शेवटच्या ओळी पेन्सिलनं लिहिलेल्या. पण त्या अक्षरांना गंध असायचा ,मायेचा ओलावा असायचा.भाकरीचा,भाजीचा,चटणीचा आणि आईवडिलांच्या मायेचा गंध. हजारो पत्र्याचे डबे रोज ...