Thursday, 12 March 2020
कविता
Monday, 9 March 2020
Thought of the day
Friday, 2 August 2019
घराचे वय
प्रत्येक घराचे वय असते ..
कोणी लिहिलय माहित नाही पण छान आणि बरोबर लिहिलय
आज सकाळपासून ती तापाने फणफणली होती,... कालच डॉकटरांनी अगदी कडक शब्दात सांगितलं होतं,...दोन दिवस फक्त आरामच करायचा,...त्यामुळे अभयने आपल्या मावशीला गावाकडून बोलवून घेतलं होतं,...गाव तसं तासभर अंतरावर होतं,... छोटीशी शेती,घर सांभाळत मावशी एकटी रहात होती,...ठेंगणी ,ठुसकी गोरी गोमटी मावशी अभयच्या एका फोनवर सकाळीच दारात हजर,...तेंव्हा बाईसाहेबांचं कुरकुरत,..वाकत कपबश्या विसळणं सुरू होतं,.. पोरं शाळेत निघून गेले होते,...मावशीने लगेच तिच्या हातातुन कप काढून घेत तिला रूम मध्ये झोपायला पाठवलं,...अभय कुरकुरत मावशीला म्हणाला," आग फार चिडचिड करत असते ही पसारा,पसारा म्हणत,...आता तू जरा समजव तिला तब्येत बघ कशी झालीये तिची कालच डॉकटर म्हणालेत जरा दोन काम कमी करून आराम करत जा,...म्हणजे शरिराला शीण येणार नाही आणि दोन चार महिन्याला असा ताप येणार नाही,...पण ही बया ऐकेल तर,.…" मावशी हसुन म्हणाली अरे असतंच बायकांना सगळ्याच डगरीवर हात ठेवावा वाटतो,.. आता आहे मी आठवडाभर सांगते तिला समजावून,....चल तुला डबा भरून देते तू निघ उशीर होईल तुला,... अभय गेला मावशीने मस्त आल्याचा चहा बनवला आणि आली रूपाच्या खोलीत,...रूपा उठून बसली,"मावशी अहो चहा कशाला केलात,..?" " घे ग तेवढंच फ्रेश वाटेल तुला,... रोज नोकरी,मुलांचं,नवऱ्याचं आणि घराचं करून दमत असशील ना,..."मावशीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसं तिला रडूच आलं,.."खरं आहे मावशी,खुप थकून जाते मी,... कदाचित म्हणूनच शरीर असे दुखणे काढत असेल आरामासाठी ,पण काय करणार मावशी घरात इतका पसारा होतो ना की खुप वेळ तर माझा घर अवरण्यातच जातो,.." मावशी हसुन म्हणाली,..."प्रत्येक घराचं ना वय असतं ते स्वीकारायला शिकता आलं ना ग मग त्रास होत नाही पसऱ्याचा,..." तिला कळेना नेमकं काय म्हणायच आहे मावशींना आणि घराला वय म्हणजे,..??मावशींच्या लक्षात आलं,..हिला घराचं वय कळलं नाही,...मावशी हसुन म्हणाली,...तू प्राजक्ता कडे जातेस ना,..म्हणजे माझी सून ग नोकरीमुळे नाही राहत माझ्याकडे,...तिच्या घरी तू गेली आहेस ना,....मावशीच्या प्रश्नाला ती उत्तर देत म्हणाली,.."हो घरभर खेळणे पसरलेले असतात,...अगदी उड्या मारून जायची वेळ येते,...,,"हं अश्या घराचं वय 1 ते 5 वर्ष,...आता तुझ्याकडे आहे का असा पसारा नाही आता तुझ्याकडे गोष्टींची पुस्तकं,.. रंग,खडू,रंगीत कागद आणि कपडे म्हणजे तुझ्या घराचं वय आहे 6 ते 15,...आपल्या सुनीलकडे म्हणजे माझ्या पुतण्याकडे सगळीकडे फोन,चार्जर,कपडे,पुस्तकं,.. बुटांचे चपलांचे जोड,..ते वेगवेगळे स्प्रे ह्याचाच पसारा कारण त्या घरच वय 15 ते 20 आणि आता माझंच घर बघ काही पसारा नाही कारण पिल्लं गेलेत ग उडून घरट्यातून मग कोण पसारा करतंय,... सगळं चित्रातल्या सारख आहे,...काही हलत नाही मला फार वाटतं कसे कसे वय होऊन गेले घराचे पण आता हे बिनपसाऱ्याच म्हातारपण पेलवत नाही,..म्हणून त्या घरच ते वय छान आनंदाने स्वीकारायला शिक कारण आपण बायका उगीच चिडचिड करून सगळ्यांना बेजार करतो आणि हे सगळं समोर असलं ना तर मुलं त्याला हात लावतात ठेवून दिल की गेलं नजरे आड,... थोडी फार आवरा आवर ठिक पण त्यासाठी अगदी दमछाक करून अस आजारपण नको ग,...घराचे हे वय परत येत नाहीत पिल्लं आहेत तेव्हाच घराची ही मजा अनुभवायची असते,...मग आहेच आपलं म्हातारपणीच शांत आणि स्वच्छ घर,.. तिलाही पटलं मावशींच म्हणणं आणि खरंच आठवलं मुलांचं बालपण सगळीकडे खेळणे,...बाहुल्या,सायकली,..आता सगळे पुस्तकं, रंग पण आता मावशींनी घराच्या वयाची दृष्टी दिल्याने नकळत तिला तो पसारा वाटत नव्हता तर घर सजावटीच समानच वाटत होतं,...ती हसुन म्हणत होती 6 ते 15 वयातल आहे माझं घरं आणि कौतुकानं घराकडे पहात होती😊
👆🏼कीती छान पोस्ट आहे ही! घराचं वय असू शकतं आणि ते आपण अनुभवायचं असतं ही कल्पना भन्नाट खरी पण
खूssssप गोड!!
Thursday, 27 June 2019
*This poem made me cry*.
*This poem made me cry*.
So I drank soda instead.
I know you are always right.
But as I pulled out into the road,
The other car didn't see me Mom,
And hit me like a load.
I hear the policeman say, "the other guy is drunk," Mom,
And now I'm the one who will pay.
My life just burst like a balloon.
I swear I didn't drink.
It was the others, Mom.
The others didn't think.
The only difference is, he drank and I will die.
It can ruin your whole life.
I'm feeling sharp pains now.
Pains just like a knife.
And I don't think it's fair.
I'm lying here dying and all he can do is stare.
Put "GOOD BOY " on my grave.
Not to drink and drive.
If only they had told him, Mom,
I would still be alive.
Please don't cry for me, Mom.
When I needed you, you were always there.
Before I say good bye.
I didn't drink and drive,
"So why am I the one to die?"
Thursday, 11 April 2019
घेऊ का पोटापुरतं.....
Friday, 15 March 2019
जागतिक ग्राहक दिन
🤔 *जागतिक ग्राहक हक्क दिन; ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय?*
आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना विविध 6 हक्क प्राप्त झाले आहेत. आज त्याबाबत जाणून घेऊयात...
1) *संरक्षणाचा/सुरक्षिततेचा हक्क* : जीवित किंवा मालमत्तेला धोकादायक अशा वस्तूंच्या वापरापासून संरक्षण मिळविण्याचा हक्क ग्राहकाला आहे.
2) *माहिती मिळविण्याचा हक्क* : आपण जी वस्तू खरेदी करतो तिच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा ग्राहकाला हक्क आहे.
3) *निवडीचा हक्क* : योग्य किंमतीत आपल्या वस्तूची निवड करण्याचा हक्क ग्राहकाचा आहे. ग्राहकांनी दक्ष राहून वस्तूच्या किंमती व गुणवत्ता यांचा विचार करुनच योग्य वस्तूची खरेदी करावी.
4) *तक्रार निवारणाचा हक्क* : वस्तूच्या खरेदीनंतर काही दोष आढळल्यास किंवा खरेदीत फसवणूक झाली असे वाटत असल्यास ग्राहकांना त्या संबंधी ग्राहक न्यायालयात तक्रार करण्याचा अधिकार आहे.
5) *ग्राहक शिक्षणाचा हक्क* : बाजारपेठेची व व्यापारी व्यवहाराची ग्राहकाला माहिती असणे आवश्यक आहे. ग्राहकाच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आहेत.
6) *आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क* : ग्राहकांना प्रदूषणापासून संरक्षण मिळविण्याचा हक्क आहे. याबरोबरच प्रामाणिकता मिळविण्याचा, मत प्रदर्शन करण्याचा ग्रहाकांचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क ही ग्राहकाला आहे.
💁♂ *ग्राहकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय?* :
▪ कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता किंवा स्वच्छतागृहचा वापर करू शकता
▪ सुटे पैसे नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या-चॉकलेट देऊ शकत नाही. चलनाला दुसरी पर्यायी वस्तू देण्याचा अधिकार दुकानदारांना नाही
▪ जाहिरातीमध्ये दिलेलं वचन न पाळल्यास तुम्ही कंपनीवर दावा तर ठोकू शकतातच, पण त्याचबरोबर त्या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवरही दावा करू शकता
▪ जर रुग्णालयानं काही सेवा देण्यासाठी पैसे स्वीकारले असतील तर त्या सेवा देण्यास ते बांधील आहेत. जर त्यांची पूर्तता त्यांनी केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते
🎯 *सर्व माहिती एकाच ठिकाणी* : ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या jagograhakjago.gov.in या वेबसाईटवर ग्राहकांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल
Friday, 12 October 2018
कथा
मालकानं बैलासमोर गव्हाणीत पेंडीचा पीळ मोकळा केला तसा रवंथ करत बसलेला बैल उठून उभा राहिला, मालक गोठ्याच्या बाहेर गेल्याची खात्री करून बकरं आत शिरलं.. आडव्या मेढीवर गोठ्यात 'तपश्चर्या' करत बसलेलं कोंबडं उडी मारून गव्हाणीत येऊन बसलं.. इकडेतिकडे पहात एक उंदीर गव्हाणीत येऊन बसला अन रोजची 'गोलमेज परिषद' सुरू झाली... सुखदुःखाच्या गप्पा मारत-मारत.. बैल कडब्याच्या पेंडीतली चिपाडं, पान-पान शोधून बकरं, एखाददुसरे राहिलेले कणीस शोधत कोंबडं तर गव्हाणीत पडलेले ज्वारीचे दाणे अन सुग्रासवर उंदीर ताव मारण्यात दंग झाले..!
अगदी दृष्ट लागावी अशी एकी...
चौघेही आनंदात जगत होते...
चारही जण जिवलग मित्र, वेगवेगळ्या संवर्गात असले तरी शेवटी सर्व प्राणीच...! एकमेकांच्या सुखदुःखाचे साक्षीदार ! नास्ता,लंच अन डिनर एकत्र करणारे अन मालकाच्या सदैव चाकरीत असणारे, प्रामाणिक असणारे...!!
सकाळची न्याहरी आटोपली अन उंदीर आपल्या नित्यनियमाप्रमाणे घराची परिक्रमा करायला निघाला...!
मित्रांच्या संगतीमुळे मालकाला त्रास होईल असे तो अजिबात वागत नव्हता..!
पण त्याला आज अचानक एक धक्का बसला.. थरथर कापू लागला.. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला....
'अहो.. एक उंदीर रोज दिसतोय हो.. कुठं काही नुकसान नाही पण त्याचा वेळीच बंदोबस्त करा !' ओसरीत पेपर वाचत बसलेल्या मालकाच्या हातात चहाचा कप टेकवत मालकीण बोलल्या...!
'अगं व्हय की, म्या पण त्याला पाहिलंय.. आज बाजारातून येतांना पिंजरा घेऊन येतो..!'
उंदीर भेदरलं... परिक्रमा विसरलं... अन थेट गोठ्यात मित्रांकडे धाव घेतली...
गोठ्यात फक्त कोंबडं होतं, ' दादा..दादा.. !'
'काय झालं रे ? एवढी धाप का लागली ? एखादा बोक्या लागला का पाठी ??' कोंबडं हसतच बोललं.
'नाय पण मालक माझ्यासाठी पिंजरा आणणार हाय म्हण.… त्यांच्या तोंडून ऐकून आलोय !' उंदीर आवंढा गिळत बोललं.
'मग ??' कोंबडं.
'भाऊ मला वाचवा !' आर्त स्वरात उंदीर बोलत होतं.
'नाय बा, पिंजरा तुझ्यासाठी आहे अन 'समस्या' पण तुझीच आहे... तुझी तू निपट !' कोंबडं अंग झटकत बोललं !
पडलेल्या चेहऱ्यानीशी उंदीर आपली 'समस्या' घेऊन गोठ्याबाहेर चरत असलेल्या बकऱ्याकडे गेला..!
बकऱ्याने सर्व हकीकत गंभीरपणे ऐकून घेतली.. अन गालातल्या गालात हसला..
'लावू दे मालकाला पिंजरा.. त्याने काय होतंय ? तू फक्त पिंजऱ्यात जाऊ नको ! चिल्लर गोष्टींसाठी माझा वेळ खाऊ नको..! तुझे कोडे तूच सोडव.. पुन्हा त्रास देऊ नको ..!!'
खाडकन तोंडात चपराक बसल्यावर जसा चेहरा होतो तसा चेहरा घेऊन तो शेतात चरत असलेल्या अनुभवी वयस्कर बैलाच्या दिशेने आपल्या सर्व आशा, आकांक्षा अन अपेक्षा घेऊन धावला...!
बैलाने त्याची सर्व 'समस्या' ऐकली.. समस्या ऐकेपर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला....
'त्याचं कसं आहे उंदीर भाऊ, मी आहे पाळीव, अन त्यात 'मालकाच्या दावणीला' बांधलेला..! तुला मदत करण्याची माझी प्रचंड इच्छा आहे पण.... थोडंस अवघड वाटतंय..! तसं मी मालकाला बोलून बघतो... तू उद्या भेट..!' बैलाची ही प्रतिक्रिया ऐकून त्याचा मैत्रीवरचा विश्वासच उठला...!!
सायंकाळ झाली....
मालक गोठ्यात शिरले... मालकीण मागेच होती... मालकाच्या हातात 'उंदराचा पिंजरा होता!' मालकीनीच्या सांगण्यावरून त्याने तो दगडाच्या पवळीला असलेल्या भगदाडाजवळ लावला.. उंदराची जाय - यायची वाट तीच तर होती...
पिंजरा लावून मालक मालकीण निघून गेले...
उंदराने गव्हाणीच्या साक्षीने सर्वसमोर एक आर्त मागणी केली...
-- 'तुम्ही सर्व माझे आधारस्तंभ आहात, माझं भवितव्य तुमच्या हातात आहे... मी तुमच्यापैकी एक आहे.. आज संकट माझ्यावर ओढवलंय उद्या तुमच्यावर ओढवेल कृपया मदत करा, मला वाचवा !' तो मनातून विनंती करत होता...!
पण सर्वजण त्याला हेतुपुरस्कर टाळत होते ..!
"दोस्त दोस्त ना रहा....!!" गाणे बॅकग्राऊंड ला वाजत होते...!
हताश अन निराश होऊन उंदीर निघाला...!
पवळीच्या भगदाड जवळ लावलेल्या पिंजऱ्याकडे हताश नजरेने पहात अन कालपर्यंत 'संघटनेत, एकीत अन समूहात असणाऱ्या बळाबद्दल चर्चा करणाऱ्यांनी 'समस्या तुझी-अन-उपाय तूच शोध !' असा उपदेश करत अनेक दिवसाची मैत्री क्षणात तोडली होती..!!
दावणीतले 'पाळीव' अन हा 'उपरा' असे दोन भाग स्पष्ट झाले होते...!!
उंदराने जागा बदलली, मेढीवर तुराट्याच्या काड्यावर गवत अंथरून तिथे तो झोपू लागला.. तशी पडण्याची भीती होती पण पिंजऱ्यात अडकून मरण्यापेक्षा हे बरं ... !
रात्र झाली होती.... अचानक गोठ्यातून खडखड असा आवाज येत असल्याने मालकीणबाई आल्या.. 'नक्की पिंजऱ्यात उंदीर अडकला असेल...' गोठ्यात आल्या.. थोडासा अंधार असल्याने दिसत होते... अंदाज बांधत सकाळी ठेवलेल्या पिंजऱ्याच्या दिशेने पुढे सरकल्या... जिकडे हालचाल जाणवत होती तिकडे पिंजरा थोडासा अस्पष्ट दिसला म्हणून तिने तो पिंजरा उचलला.... अन तितक्यात तिला काहीतरी चावल्याची जाणीव झाली म्हणून तिने पिंजरा फेकून दिला..!
पिंजऱ्यात अर्धवट आत अन अर्धवट बाहेर अशा अवस्थेत 'विषारी साप' अडकला होता !!
मालकीण दवाखान्यात शरीक झाली... मालकाने तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले... खूप पैसा लावला...
काही दिवस निघून गेले... मालकीण दवाखान्यात अन मालक दिवाळखोर...!
*"एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ.."*
एक दिवस मालक गोठ्यात शिरला.. त्याच्या मागोमाग एक माणूस... मालकाने कोंबड्याला आवाज दिला अन पकडले अन सोबत आलेल्या माणसाशी सौदा करून त्याच्या हवाली केले... अत्यंत हताश नजरेने मित्रांकडे पाहत जीवाचा आकांडतांडव करत कोंबड्याने मित्रांचा निरोप घेतला..!
उंदीर सर्व वर बसून पहात होता...
चार दिवस उलटले....
पुन्हा मालक अन तोच माणूस गोठ्यात शिरले.... बकऱ्याच्या पाठीवर त्याने हात फिरवला तसं बकरं थरारलं... त्याला घाम फुटला... उजव्या हाताने त्याने बकऱ्याच्या पोटाजवळच्या फासळीत दाबले अन मालकाशी बोलून सौदा पूर्ण केला.. मालकाच्या हातावर पैसे टेकवत बकऱ्याला सोबत घेऊन निघाला....
बकऱ्याच्या आकांताबरोबरच बैलाच्या डोळ्यातून दोन अश्रू टपकले....
पुन्हा आठ दिवस निघून गेली...
मालक गोठ्यात शिरले ... आज त्यांच्या बरोबर दोन माणसे लुंगी, बनियन अन टोपी परिधान करून होती..
गोठ्यात बैलाशिवाय कोणीच नव्हते.. तो शहारला... थरथरू लागला... त्याचाही सौदा झाला अन तो ही जड पावलांनी गोठ्याबाहेर पडला....
मेढीवरून पाहणाऱ्या उंदराच्या डोळ्यात अश्रू तरळले...!
जिच्या इलाजासाठी सर्व गोठा रिकामा झाला ती मालकीण पण वाचली नाही...!
..
...
जे कालपर्यंत म्हणत होते की, 'ही समस्या आमची नाही... तुझी समस्या आहे अन तू उपाय पहा..!' नेमके तेच आज त्या समस्येचे 'योग्य वेळी' निराकरण न केल्याने 'साफ' झाले होते... अन 'समस्या' ज्याची होती, तो आज आपल्या अढळ ठिकाणी विराजमान होता..!
वेळीच " कोंबडा अन बैलाच्या आवाजाच्या गजरात बैलाने पिंजऱ्यावर आपल्या दमदार खुरांचा पाय ठेवून पिंजरा मोडला असता तर 'मैत्री' पण अबाधित राहिली असती अन 'स्वतःचे अस्तित्व पण !' ..."
समस्या लहान भावाची असो, मोठ्या भावाची असो, बहिणींची असो वा सर्वसमावेशक असो ... समस्या कोणाची का असेना ... आज त्या समस्यात तो गुरफटलाय... उद्या आपण गुरफटू नये म्हणून 'कितीही छोटी.. कदाचित आपली नसली तरी.. त्यांना साथ द्या ! त्यांना जगवा अन स्वतः दुसऱ्यांसाठी जगा !!'
*"स्वतःसाठी जगणे.. मरणासम आहे !!"*
*तात्पर्य :-*
*कदाचित आपली अवस्था वरील कथेप्रमाणे होऊ नये....म्हणून सर्वांनी एकमेकांना अडचणीच्या काळात निस्वार्थ मदत केली पाहिजे !!*
फेसबुक वरील संग्रहातील....
Saturday, 10 March 2018
कोंडी
.....कोंडी...
रोज टी. व्ही. वर औरंगाबादच्या 'कचरा कोंडीची 'बातमी पाहून माझ्या मनात विचार आला,केवळ औरंगाबादच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न पुढे मागे निर्माण होऊ शकतो.याला कळत नकळत आपण सारेच जबाबदार आहोत का?
आपण कमीतकमी कष्ट करून ज्यास्त सुखात राहायचा प्रयत्न करतोय.वापरा आणि फेका ही प्रवृत्ती जपतोय.
घरात छोटासा जरी कार्यक्रम असला तरी आपण लगेच 'यूज अँड थ्रो ' वाले ग्लास, चमचे,द्रोण, डिश आणतो ,वापरतो आणि फेकून देतो.घरात शोकेस मध्ये मारे ऐटीत ग्लास ,डिनर सेट ठेवलेले असतात, पण ते वापरले तर परत धुणार कोण? म्हणून आपण ते फक्त शोकेसची शोभा वाढवण्यासाठीच ठेवतो.धुवायला वेळ कोणाला आहे ?
पूर्वी गावाला जाताना आपण मोठ्या वॉटर बॅग्ज न्यायचो.पण आता ठिकठिकाणी बिस्लरीच्या बाटल्या घेतो,वापरून फेकून देतो.
लहान मुलांचे 'लंगोट 'हा प्रकार तर आपण विसरूनच गेलोय.हगीज,सॅनिटरी नॅपकिन्स ! हात पुसायला रुमलाऐवजी पेपर नॅपकिन्स! बापरे! वापरा आणि फेका असा किती कचरा टाकतो आपण !
पूर्वी वाण सामान आणताना घरातूनच तेलाची बरणी, तुपासाठी डबा न्यावा लागायचा.आता यासाठी विविध प्रकारच्या पॉलिथीन पिशव्या किंवा बाटल्या मिळतात,नंतर त्या आपण फेकतोच.
पूर्वी लग्नाचा कितीही मोठा 'बस्ता ' बांधला तरी तो एकाच मोठ्या कापडात 'गाठोडं 'करून मिळायचा.आता प्रत्येक साडीसाठी व कपड्यासाठी स्वतंत्र पिशवीचा आपला अट्टाहास असतो.
वस्तू दुरुस्ती कडे आपला कल नसतो.बूट, चप्पल,खेळणी,छत्री अशा गोष्टी आपण लगेच फेकून नव्या घेतो.
'वापरा आणि फेका ' अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील.याला जबाबदार कोण? याचे उत्तर म्हणजे सध्याचे धावते युग म्हणावे लागेल.कोणालाही वेळ नाही.रात्र थोडी सोंगे फार.प्रत्येक जण आपापल्या कोशात आणि व्यापात इतका अडकलाय की त्याला स्वतःच्या आयुष्याची कोंडी फोडायला वेळ नाही तर कचरा कोंडीचं काय घेऊन बसलात ?
कंटाळा आला की आपण पटकन एखाद्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर करतो,पण हे पार्सल फोडल्यानंतर होणाऱ्या कचऱ्याने एक अक्खी कॅरी बॅग भरते,पण आपण मात्र वेगळ्याच आनंदात असतो.
Monday, 2 October 2017
गांधी मला भेटला..
-
डाळिंब बागेचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन - सध्या उष्णता वाढत असल्याने मार्च ते मे या महिन्यात डाळिंबाच्या नवीन बागेची लागवड करू नये. त...
-
बेनिविया (Cyantraniliprole 10.26% OD पिके (कंसात हेक्टरी प्रमाण): द्राक्ष- फुलकिडे, उडद्या भुंगा ...
-
*-हळद पिकाची निगा व रोग - कीड नियंत्रण.* हळद पिकास जमिनीत नियमित ओलावा लागतो, तसेच जास्तीचे पाणी अजिबात चालत नाही. त्यामुळे हळदीच्या शेतात ...


