Thursday, 11 April 2019

घेऊ का पोटापुरतं.....

घेऊ का पोटापुरतं.....
                

पंगतीत बसलेत दगडाचे देव रे..
दगडाच्या देवाला खाऊ जरा ठेव रे.

बसल्याजागी मिळतं तूला नैवेद्द तुपाशी
माणसांच्या बाजारात मी मात्र उपाशी...

तोंड तुझं दिसत नाही खाणार तू कसा
खाणार नसशील तू तर घेऊ का  जरासा ? ..

तू देव नाहीस असं म्हणता येणार नाही
उष्ठ तुझं नेतो खुश होईल माझी ताई...

मागत नाहीस,रडत नाहीस तरी देतात तुला.
भिका-याचं पोर म्हणून चिडवतात मला.

दगडाचा असला तरी राग येत नाही तुला
पुढयातलं खायाला  सारं देतोस का मला...

तुला जे कळतं ते माणसाला कळत नाही
माणसांतल्या माणसाला माणुसकी मिळत नाही..





No comments:

Post a Comment