Friday 12 August 2016

हळद पिक माहिती

*-हळद पिकाची निगा व रोग - कीड नियंत्रण.*

हळद पिकास जमिनीत नियमित ओलावा लागतो, तसेच जास्तीचे पाणी अजिबात चालत नाही. त्यामुळे हळदीच्या शेतात कुठे पाणी तुंबून राहत असेल तर ते बाहेर काढून देण्याची तातडीने व्यवस्था करावी. याशिवाय पिकात गवत होऊ देऊ नये दोन बेड मधून कोळपणी करीत राहावी आणि शेत स्वच्छ ठेवावे. पीक लागण असे पर्यंत एक किंवा दोन वेळेत   कोळप्यास दोरी किंवा गोणपाट लावून झाडाच्या बुडाशी माती बसेल असे पाहावे. झाडे मोठी झाल्यावर मात्र दोन वेळा हाताने मातीची भर द्यावी. जेवढी जास्त भर बसेल तेवढी हळद चांगली पोसते तसेच कीड लागत नाही. कंद उघडे पडल्यास कंद माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसे आढळल्यास जमिनीत हाताने किंवा ठिबक मधून फोरेट द्यावे. या पिकावर रोग किडींचा प्रादुर्भाव त्यामानाने कमी होतो. हवामानातील तीव्र बदलामुळे करपा रोग येऊन पानावर तपकिरी डाग पडू शकतात. त्यासाठी दर १५ दिवसांनी गोमूत्र आणि निंबोळी अर्काची फवारणी करावी. किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ची फवारणी करावी. शेंडे अळी आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मोनोक्रोटोफॉस, क्लोरोपायरीफॉस, फॉस्फोमिडॉन सारख्या कीटक नाश्काची फवारणी करावी.

No comments:

Post a Comment