Posts

Showing posts from February 10, 2019

बहुमुल्य मेथी

Image
Fenugreek - बहुमुल्य मेथी भारतात सगळीकडे मेथीची भाजी आवर्जून केली जाते. बारीक चिरून त्यात कणीक, डाळीचं पीठ, आलं, लसूण, मिरची, मीठ घालून पराठे बनवले जातात. आल्या- लसणाऐवजी धने, जिरेही घालतात. गुजरातेत त्यांना ठेपला म्हणण्याची पद्धत आहे. मेथी बारीक चिरून घालून मेथीपुरी, खाकरा, मेथीखारी, मेथीनान वगैरे पदार्थ बनवले जातात. डाळीचं पीठ घालून मेथीची गोळा भाजी, कोरडी भाजी करता येते. अशाप्रकारे केलेल्या भाज्या भाकरीबरोबर छान लागतात. त्यात लसणाची फोडणी घातल्यास चव वाढते. चवींमध्ये राणी असलेली ही मेथीची भाजी सर्व पालेभाज्यांमध्ये गुणांमध्येही अव्वल आहे. मेथीचे औषधी उपयोगही खूप आहेत. तिच्या या औषधी गुणधर्मासाठीच बाळंतिणीला आवर्जून मेथीची भाजी खायला देतातचं. मेथीची डाळ दाणे घातलेली पातळ भाजी, ताकातली भाजी, तुरीची डाळ घालून लसणीची फोडणी देऊन केलेली डाळमेथी अशा पातळ भाज्या भात, पोळी, भाकरी कशाबरोबरही चांगल्या लागतात. उकडलेले बटाटे आणि मेथी यांची आलु-मेथी किंवा मटारचे दाणे, कांदा, आलं, लसूण, मेथी आणि मलई यांची मटर मेथी मलई या रेस्टॉरंटमध्ये मिळणार्या लोकांना आवडणार्या भाज्या आहेत. पारशी पद...