Posts

Showing posts from March 30, 2016

डाळिंब माहिती

Image
डाळिंब बागेचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन - सध्या उष्णता वाढत असल्याने मार्च ते मे या महिन्यात डाळिंबाच्या नवीन बागेची लागवड करू नये. त्याच प्रमाणे हस्त व आंबे बहार धरलेल्या बागांची उन्हाळ्यात योग्य प्रकारे काळजी घ्यावी.  वाढत्या उष्णतामानाचा फटका डाळिंबाच्या बागांना बसतो, त्यामुळे जलव्यवस्थापन, आच्छादन व बाष्परोधकांची फवारणी असे उपाय करावे लागतात. - बाष्पोत्सर्जन कमी होण्याच्या दृष्टीने केओलिन २.५ ते ५ टक्के किंवा निम ऑईल १ मि.लि. प्रति लिटर याप्रमाणे डाळिंबाच्या झाडांवर फवारणी करावी. - डाळिंब बागेला शक्‍यतो रात्री पाणी द्यावे. - दुपारच्या वेळी तापमान जास्त असेल तेव्हा फक्त पाण्याचा फवारा घ्यावा. - गहू आणि सोयाबीनच्या भुश्श्याचा वापर बागेत सेंद्रिय आच्छादन म्हणून करावा. शक्य असल्यास काळ्या मल्चिंग पेपरचा वापर करावा. मात्र या दोन्ही प्रकारच्या आच्छादनाखाली वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. - बागेभोवती पश्‍चिम-उत्तर दिशेने मका अथवा शेवरीचे सजीव कुंपण तयार करावे, त्यामुळे बागेतील बाष्पोत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. - हस्त बहारातील फळ काढणी - ...