Sunday 10 February 2019

बहुमुल्य मेथी




Fenugreek - बहुमुल्य मेथी

भारतात सगळीकडे मेथीची भाजी आवर्जून केली जाते. बारीक चिरून त्यात कणीक, डाळीचं पीठ, आलं, लसूण, मिरची, मीठ घालून पराठे बनवले जातात. आल्या- लसणाऐवजी धने, जिरेही घालतात. गुजरातेत त्यांना ठेपला म्हणण्याची पद्धत आहे. मेथी बारीक चिरून घालून मेथीपुरी, खाकरा, मेथीखारी, मेथीनान वगैरे पदार्थ बनवले जातात. डाळीचं पीठ घालून मेथीची गोळा भाजी, कोरडी भाजी करता येते. अशाप्रकारे केलेल्या भाज्या भाकरीबरोबर छान लागतात. त्यात लसणाची फोडणी घातल्यास चव वाढते.

चवींमध्ये राणी असलेली ही मेथीची भाजी सर्व पालेभाज्यांमध्ये गुणांमध्येही अव्वल आहे. मेथीचे औषधी उपयोगही खूप आहेत. तिच्या या औषधी गुणधर्मासाठीच बाळंतिणीला आवर्जून मेथीची भाजी खायला देतातचं. मेथीची डाळ दाणे घातलेली पातळ भाजी, ताकातली भाजी, तुरीची डाळ घालून लसणीची फोडणी देऊन केलेली डाळमेथी अशा पातळ भाज्या भात, पोळी, भाकरी कशाबरोबरही चांगल्या लागतात. उकडलेले बटाटे आणि मेथी यांची आलु-मेथी किंवा मटारचे दाणे, कांदा, आलं, लसूण, मेथी आणि मलई यांची मटर मेथी मलई या रेस्टॉरंटमध्ये मिळणार्या लोकांना आवडणार्या भाज्या आहेत. पारशी पद्धतीच्या भाज्यांमध्येही मेथी असते. मेथीची भजी उत्तम होतात. विशेषत: खास समुद्रकिनारी मुंबईसारख्या ठिकाणी मिळणारी वाळूत उगवणारी कोवळी मेथी, तर भज्यांसाठी खासच असते. गुजराथी उंधियोमध्ये मेथीचे मुटके हा एक महत्त्वाचा घटक असतो. दक्षिण भारतात चिरलेली मेथी, कांदा, तांदूळ असं फोडणीला टाकून त्यात लिंबू, सांबार मसाला घालून ‘मेथी राईस’ बनवला जातो. मेथीची धिरडीही उत्तम होतात. मध्य व पश्चिम आशिया आणि चीनमध्येही मेथी शिजवून वापरली जाते.

मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. चला तर मग बहुमुल्य मेथी खाल्याने काय-काय फायदे होतात ते जाणून घेऊयात...

1) मेथीचे पान लिव्हच्या फंक्शनला योग्य ठेवण्यासोबतच अपचनाच्या समस्येला दूर करतात. गॅसच्या समस्येने त्रस्त असाल तर जेवणात मेथीची पाने घ्या.

2) डायरिया आणि डिसेंट्रीच्या इलाजामध्ये देखील मेथी खाणे चांगले असते. मेथी आतड्यांना डिटॉक्स करण्याचे काम करते.

3) एखादी अलर्जी असो किंवा श्वास घेण्यात समस्या, मेथी सर्व प्रकारच्या रोगांना दूर करण्यात मदत करते.

4) वाढत्या कॉलेस्ट्रॉलची समस्या असेल तर मेथी सर्वात चांगला उपाय आहे. मेथीची पाने रात्रभर पाण्यात भीजवून ठेवा आणि सकाळी याचा ज्यूस बनवून प्या.

5) मेथी आणि दालचीनीमध्ये एक समान तत्त्व मिळतात. यांचे अँटी-बायोटिक तत्त्व बॉडीच्या ग्लूकोज लेव्हलला वाढू देत नाही. यासाठी टाइप-2 डायबिटीजच्या रुग्णांना मेथीची पाने खाने फायदेशीर असते.

6) मेथीमध्ये उपलब्ध ग्लेक्टोमेनन, हार्टला हेल्दी ठेवण्याचे काम करते. यासोबतच यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. जे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशरला कंट्रोल करते. ज्यामुळे हाय आणि लो बीपी होत नाही.

7) मेथीचे बीज आणि पाने फायबर आणि अँटी-ऑक्सीडेंटने भरपूर असतात. जे खाल्ल्याने शरीरातील घाण बाहेर पडते. पोट दुखी किंवा डायजेशन खराब झाल्यावर मेथीची पाने चहामध्ये मिळवून घ्या, आराम मिळेल.

8) मेथीच्या पानांना रात्रभर पाण्यात भीजवून ठेवून याचे पाणी सेवन केल्याने बध्दकोष्ठची समस्या दूर होईल.

9) जर लठ्ठपणा कंट्रोल होत नसेल तर सकाळी उपाशीपोठी मेथीचे बीज खाणे सुरु करा. यातील फायबर तत्त्व पोट भरलेले असल्याचा अनुभव देते. ज्यामुळे जेवण करण्याची इच्छा होत नाही आणि वजन हळुहळू कमी होते.

10) असीडीटीच्या समस्येवर मात करण्यासाठी जेवणात मेथीचा वापर हवा. मेथीची पाने पाण्यात भीजवून थोडा वेळानंतर याचे सेवन करा.

11) एक चमचा मेथी लिंबू आणि मधासोबत खा, यामुळे बॉडीला न्यूट्रिशन मिळते आणि ताप कमी होतो.

12) कफ आणि घसा दुखण्याची समस्या दूर करण्यासाठी देखील मेथी फायदेशीर आहे.

13) जेवणात जेवढा शक्य होईल तेवढा मेथीचा वापर करा. कारण याचे फायबर तत्त्व बॉडीला डिटॉक्स करण्याचे काम करते. ज्यामुळे कोलन कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

14) व्हिटॅमिन सी खुप चांगले अँटी-ऑक्सीडेंट असते. यासोबतच याचा अँटी-इन्फ्लेमेटरी गुण अनेक प्रकारचे स्किन प्रॉब्लम दूर करण्यात मेथी मदत करते. हे चेहर्यावरील डाग दूर करुन चेह-याचा रंग उजळवते.

15) सुज येण्याची समस्या असेल तर मेथीला पाण्यात भीजवा आणि कपड्यात बांधून ठेवा, हे सुज आलेल्या ठिकाणी लावा. नक्की फायदा होतो.

16) मेथीचा फेसपॅक वापरल्याने चेहर्यावरील पिंपल्स, रिंकल्स आणि ब्लॅकहेड्स दूर करता येतात. यासाठी मेथीची पाणे पाण्यात उकळून त्या पाण्याने चेहरा धुवा. याव्यतिरिक्त मेथीच्या पानांची पेस्ट बनवून 20 मिनिटांपर्यंत चेह-यावर लावून ठेवा. चेह-यावर एक वेगळीच चमक येईल.

17) डाएटमध्ये मेथीचे पान घ्या आणि मेथीची पेस्ट केसांच्या मुळांना लावा. असे केल्याने केस काळे, दाट आणि चमकदार होतील. मेथीचे बीज रात्रभर तेलात भीजवून ठेवा आणि याने सकाळी मालिश करा. खुप लवकर आराम मिळेल.

18) मेथीचा वापर प्रेग्नन्सीच्या काळात होणार्या लेबर पेनपासुन आराम देतो. परंतु खुप जास्त खाल्ल्याने मिसकरेज आणि प्री मॅच्योर बेबी होण्याची शक्यता असते. यामुळेच याकाळात मेथीचा खुप जास्त वापर करण्यापासुन वाचले पाहिजे.

जमीन : मेथी ओलिताची सोय असलेल्या जुन्या मुरलेल्या बागायत जमिनीमध्ये उत्तम येते. पाण्याचा निचरा असणारी, मध्यम खोलीची, कसदार जमीन असावी.

हवामान : मेथी लागवड थंड हवामानात तसेच योग्य सुर्यप्रकाश व हवेत आर्द्रता असताना करणे आवश्यक असते.

लागवड : मेथीचे रान नांगरू नये कारण बी खोल जाऊन उगवण मार खाते. त्यासाठी जमिनीची फणणी करून मशागत करावी. म्हणजे बियांची उगवण होऊन मुळे चांगली जमिनीत रुजतात. कल्पतरू सेंद्रिय खत टाकून सारे ओढावेत. मेथी फोकण्यापुर्वी १ पोत्यास १ लि. जर्मिनेटर + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + ५० ते ६० लि. पाणी या द्रावणामध्ये मेथी बी रात्रभर भिजवून नंतर उपसून सावलीत प्लॅस्टिक कागदावर सुकवावे. नंतर वाफ्यात पेरावे किंवा फोकावे. बी साधारण ४ ते ५ दिवसात कडक उन्हाळा असतानाही उगवून येते. एकरी बियाने ८० किलो लागते. भाजीसाठी मेथी करायची असल्यास लांब सारे पाडणे.

जात : महराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांकडे नव्या वाणांच्या बियांची लागवड झालेली दिसते.

१) कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन),

२) पुसा अर्लि बंचिग,

३) मेथी नं. ४७ या प्रकारच्या जाती आढळतात.

१) कसुरी सिलेक्शन : या मेथीची पाने लहान, गोलसर असून तिची वाढ सुरुवातीला फारच सावकाश होते. या मेथीची रोपे लहान झुडूपवजा असतात. आणि फांद्या आणि देठ नेहमीच्या मेठीपेक्ष बारीक असतात. या मेथीची फुले आकर्षक पिवळ्या रंगाची, लांब दांड्यावर येणारी असून शेंगा लहान, कोयत्याच्या आकाराच्या आणि बाकदार असतात, तर बिया नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात. कसुरी मेथी अधिक सुगंधित आणि स्वादिष्ट असते. कसुरी मेठीमध्ये कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन) हा सुधारित वाण भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी विकसित केला असून तो दीड महिन्यात तयार होतो. हा वाण उशीरा तयार होणारा असला तरी त्याचे अनके खुडे घेता येतात आणि हा वाण परसबागेत लावण्यास फार उपयुक्त आहे. बी तयार होण्यास १५० ते १६० दिवस लागतात.

२) पुसा अर्ली बंचिंग : हा वाण लवकर वाढतो. या मेथीला भरपूर फांद्या येतात आणि वाढीची सवय उभट असते. या मेथीचे पाने लंबगोल किंवा गोलसर आणि मोठी असतात. या मेथीची फुले पांढरी असून ती शेंड्याकडे पानांच्या बेचक्यातून प्रत्येक ठिकाणी दोन किंवा तीन येतात.

या मेथीच्या शेंगा लांब आणि बी मोठे असते. पुसा अर्ली बंचिंग ही सुधारित जात भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केली आहे. या मेथीची वाढ उभट व लवकर होते. पाने हिरवी असून १२५ दिवसांत बी तयार होते.

३) मेथी नं. ४७ : महराष्ट्रात मेथी नं. ४७ हा सुधारित वाण विकसित करण्यात आला आहे.

याशिवाय बऱ्याच ठिकाणी स्थानिक वाणांची लागवड केली जाते. हिरवी, कोवळी लुसलुशीत पाने, लवकर फुलावर न येणे, कोवळेपणा जास्तीत जास्त टिकून राहणे ही या चांगल्या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत.

खत नियोजन : बी टाकण्याअगोदर वाफ्यात कल्पतरू खताचा वापर एकरी ४० ते ५० किलो करावा. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकून धरला जाते. रासायनिक खते शक्यतो देऊ नयेत.





No comments:

Post a Comment