Friday 21 June 2019

व्यायाम कसा व कधी करावा? (How to do Exercise)


व्यायाम कसा व कधी करावा? (How to do Exercise)

व्यायाम कसा व कधी करावा?
: संजीव भरस

चांगला व्यायाम करावा योग्य वेळी करावा योग्य पद्धतीने करावा हे सर्वांनाच ऐकून माहिती आहे, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. पण व्यायाम करत असताना प्रत्येकाच्या मनात अनेक न्यूनगंड असतात. अनेकांना व्यायाम कसा करावा कोणत्या पद्धतीने करावा, आहार कसा असावा अशा अनेक प्रकारच्या गोष्टींची शंका असते. पण आता गोंधळू नका आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू. आज चा एक विषय आहे.

व्यायाम करते वेळी पोट रिकामे असावे कि भरलेले?

अनेक संशोधनानुसार याचे उत्तर मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. बर्याच अभ्यासक्रमातून रिकाम्या पोटी केलेल्या कसरतीने (व्यायामाने) आपल्याला दीर्घ कालावधीचा फायदा होऊ शकतो.

खाऊन व्यायाम करणे किंवा उपाशी पोटी व्यायाम करणे दोन्हीचा अगोदर पोज वा चरबीच्या पेशीतील जनुकीय फरक किंवा व्यक्तीवर होणार्या परिणामांचा अभ्यास त्यात करण्यात आला आहे. काहीतरी खाल्ल्यानंतर व्यायाम केल्यास चरबीच्या पेशी त्या खाण्याला प्रतिसाद देऊ लागण्यात व्यस्त होतात आणि अशा वेळी चढाओढीने व्यायाम केला तरीसुद्धा त्यांच्यावर फारसा फायदेशीर प्रभाव किंवा बदल होताना दिसून येत नाही, असे मत अनेक अभ्यासकांचे आहे.

म्हणजेच असे कि रिकामी पोटी व्यायाम केल्यास चरबीच्या पेशीत अपेक्षित बदल होतात किंवा कारणीभूत ठरतात आणि त्याचे आरोग्यावरही अनेक दीर्घकाळ फायदे होतात. त्यामुळे नेहमी व्यायामाचा चरबीच्या पेशीवरती होत असणारा परिणाम खाल्याकारणाने व्यर्थ ठरतो असे निष्कर्ष संशोधकांनी काढलेले आहेत.

अशा चाचणी मध्ये काही जाडजूड किंवा कमी वजन असलेल्या पुरुष व्यक्ती सामील करण्यात आल्या होत्या. ज्या रिकामी पोटी ठराविक टक्केवारीत जास्तीत जास्त ऑक्सिजन खर्च होईल अशा बेतात एक तास चालत होत्या आणि दुसर्या वेळी उष्मांक असलेली न्याहारी केल्यानंतर २ तासाने चालत होत्या. संशोधकांनी जेवणाअगोदरचे आणि जेवणानंतरचे असे वेगवेगळे रक्ताचे नमुने गोळा केले होते. आणि त्यातून चरबीच्या पेशींचे नमुने चालण्याअगोदर आणि चालल्यानंतर एक तासाने घेतले होते. तेंव्हा दोन्ही नमुन्या मध्ये वेगवेगळा फरक समोर आला.

त्यावेळी रिकाम्या पोटी व्यायाम केलेले होते तेंव्हा pdk 4 आणि hcl या दोन्हीतील प्रतिसाद वाढला होता तर खाल्ल्यानंतर व्यायाम केलेल्या लोकामध्ये हा प्रतिसाद वेगळा होता.

तर व्यायामाबद्ल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडून रहा. आणखीन नवीन माहितीसह परत भेटू.

धन्यवाद.




No comments:

Post a Comment