Posts

📚शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम..📚

🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈 Watavruksha Infotech Foundation,For New Generation. Ashta 416301 📚शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम..📚 सांगली  जिल्ह्यातील अनाथ व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणोपयोगी व शिक्षणपु...

तणांचे वर्गीकरण

Image
अ.  जमिनीनुसार वार्षिक तणे  – आघाडा, कुर्डू, रब्बीतणे – वसंतवेल, रानपैजी उन्हाळीतणे द्वैवार्षिक तणे  – राणगाजर, राणकांदा बहुवार्षिक तणे  – हरळी, लव्हाळा, कुंदा, रुई, घाणेरी ब.  ज्या ठिकाणी आढळतात त्यानुसार पिकामधील तणे  – टारफुला, रानओट, पाखड, बंबाखू, खंडकुळी, माठ, काटेमाठ, ओसाडी, तादुंळजा पडीक जमिनीतील तणे  – रानबाभूळ, रानबोर, रुई कुरणातील तणे  – गाजर गवत, पिवळी तिळवण कालवा, पाण्याचे पाट, डबके -  लव्हाळा, माका, पाणकुंभी. रस्त्याच्या कडेला रेल्वेमार्ग  – गाजरगवत, रूई टाकळा क.  जमीन प्रकारानुसार हलक्या जमिनीतील तणे  – आघाडा, चिमनचारा, कुर्डू, सराटा, गोखरु, बरबडाव जोंधळी भारी जमिनीतील तणे  – लव्हाळा, हरळी, कुंदा पाणथर तणे  – पाणकणीस, लव्हाळा ड.  पानाच्या रुंदीनुसार व बियाच्या दलानुसार एकदल तणे  – अरुंद पानाची तणे, फांद्या नसलेली तणे, उदा. गवत चिमनतारा, हरळी द्विदल तणे  – रुंद पानाची तसेच फांद्या असलेली तणे उदा. दुधनी, कांगाणी कई.

वेळ द्या........

Image
कामासाठी वेळ द्या  कारण यशाची ती किंमत आहे विचार करण्यासाठी वेळ द्या कारण शक्तीचे ते उगमस्थान आहे खेळण्यासाठी वेळ द्या कारण तारुण्याचे ते गुपित आहे  वाचण्यासाठी वेळ द्या कारण ज्ञानचा तो पाया आहे स्नेहासाठी वेळ द्या  कारण सुखाकडे नेण्याचा तो मार्ग आहे स्वप्नांसाठी वेळ द्या कारण ध्येयाकडे जाण्यास तो सोबत करील हस्यविनोदासाठी वेळ द्या कारण ते जीवन संगीत आहे........

तुरटीचे गुणधर्म

Image
बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल’ साधारण २०ग्रॅम साबणाची किंमत ४०० रुबेल म्हणजे ८०० रुपये होती आयुर्वेद ही भारताची एक ओळख! संपूर्ण जगाकडे जे नाही ते भारताकडे आहे. ते ज्ञान म्हणजे आयुर्वेद. त्यामुळे हे शिकण्यासाठी ज्याप्रमाणे जगभरातून लोक आज भारताकडे येत आहेत, त्याचप्रमाणे कित्येक वैद्य वेगवेगळ्या देशांमध्ये आयुर्वेद प्रचार कार्यासाठी जात आहेत. त्यांना सर्व प्रगत देशांकडून आग्रहाचे निमंत्रण मिळत आहे. मलासुद्धा गेली ७-८ वर्षे रशियामध्ये आयुर्वेद शिकविण्यासाठी जायची संधी मिळाली. मात्र प्रत्येक वेळी मीच काही तरी शिकून येतोय की काय असे मला वाटते. कारण आपण जेवढा आयुर्वेद वापरत नाही त्यापेक्षा थोडा जास्त आपलाच आयुर्वेद रोजच्या वापरात वापरणारे लोक मला तिथे भेटले. एकदा एका रुग्णाशी सहज गप्पा मारत बसलो होतो तर तो मला तो रोज वापरत असलेल्या भारतीय बाजारपेठेतील काही आयुर्वेदिक वस्तूंची माहिती सांगायला लागला. आयुर्वेदिक टूथपेस्ट, साबण, तेल असे सांगून झाल्यावर तो मला म्हणाला की तुमचा तो ‘नॅचरल क्रिस्टल सोप तर फारच छान आहे. रशियन भाषेत नॅचरल चा उच्चार ‘नतुराल’ असा करतात त्यांच्या भाषेत ऐकायला फार...

मिलनरिंग - सामुहिक विवाह सोहळा

Image
मिलनरिंग - सामुहिक विवाह सोहळा शेतकरी / शेतमजुर यांनी मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करू नये  म्हणून मुलीच्या विवाहासाठी रु. १०००० इतकी अनुदानित राशी दिली जाते.  मंगळसुत्र व किमान आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी सहाय्यक अनुदान दिले जाते.  सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी वटवृक्ष   सहयोगी संस्थांमार्फत सहभागी बांधवांच्या मुला- मुलींच्या लग्नात ' फुलाची पाकळी ' समजुन अर्थसहाय्य केले जाते.    जिल्हाधिकारी , जिल्हा पोलिसप्रमुख तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न केले जाते. सहभागी होणाऱ्या वधु-वरांसाठी नियम व अटी वधु , वर व त्यांचे पालक वटवृक्ष शेतकरी लाभार्थी घटक असावेत. वधु-वर हे संस्थेच्या कार्यक्षेत्रात (महाराष्ट्रात) राहणारे असावेत. प्रथम वधु-वरास तसेच विधवा आणि घटस्फोटीत वधुच्या विवाहासाठी वटवृक्ष कडून सहकार्य केले जाईल. लाभार्थी कोणत्याही क्षणी नोंदणी करू शकतात परंतु एका सहयोगी संस्थेकडे किमान १० लाभार्थी जोडप्यांची सहभागी जोडप्यांनी निबंधक विवाह नोंदणी यांच्याकडे नोंदणी करणे आणि प्रमाणपत्र घेणे अनिवार्य ...

घेऊ का पोटापुरतं.....

Image
घेऊ का पोटापुरतं.....                  पंगतीत बसलेत दगडाचे देव रे.. दगडाच्या देवाला खाऊ जरा ठेव रे. बसल्याजागी मिळतं तूला नैवेद्द तुपाशी माणसांच्या बाजारात मी मात्र उपाशी... तोंड तुझं दिसत नाही खाणार तू कसा खाणार नसशील तू तर घेऊ का  जरासा ? .. तू देव नाहीस असं म्हणता येणार नाही उष्ठ तुझं नेतो खुश होईल माझी ताई... मागत नाहीस,रडत नाहीस तरी देतात तुला. भिका-याचं पोर म्हणून चिडवतात मला. दगडाचा असला तरी राग येत नाही तुला पुढयातलं खायाला  सारं देतोस का मला... तुला जे कळतं ते माणसाला कळत नाही माणसांतल्या माणसाला माणुसकी मिळत नाही..

प्रयास कर तू...

प्रयास कर तू, प्रयास कर सूरज शोला बरसाए, सफलता मिलने को तरसाए, रात घनी छाये, विफलता साथ लाये, फिर भी जीने की आहें भर, प्रयास कर तू, प्रयास कर साहस साथ छोड़े, आशा मुंह मोड़े, मन लगे ...