माझ्ये नजरेतून -09 UMED कर्मचारी म्हणजे गुलाम नव्हेत! महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्यांच्या सन्मानाचं काय?
UMED कर्मचारी म्हणजे गुलाम नव्हेत! महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्यांच्या सन्मानाचं काय? “हजारो महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्याचं स्वप्न घेऊन काम करणारे हात स्वतःच्या आयुष्यात मात्र असुरक्षिततेशी झुंजत असतील, तर ही व्यवस्था नेमकं कोणाचं सक्षमीकरण करते?” ग्रामीण भागातील एखाद्या महिलेच्या हाताला रोजगार मिळावा, बचत गटाच्या माध्यमातून तिच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, एखाद्या बचत गटाला बँकेचं कर्ज मिळावं, एखाद्या एकल महिलेला जगण्याचा नवा आधार मिळावा… यासाठी दिवसरात्र धडपडणारे अनेक कर्मचारी म्हणजे UMED अभियानातील कर्मचारी. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना संघटित करणं, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं आणि त्यांच्या उपजीविकेच्या संधी वाढवणं हे महत्त्वाचं काम केलं जातं. या कामाच्या केंद्रस्थानी महिला बचत गट असले, तरी त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांची मेहनत असते. मात्र एक प्रश्न विचारावासा वाटतो— महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी झटणाऱ्या UMED कर्मचाऱ्यांच्या स्व...