कृषी माहिती
परभणी जिल्ह्यातील बोरी येथील मुरलीधर गोरे यांनी दूरदुष्टीने मशागतपूर्व ते पेरणी-काढणीपर्यंत शेतीत यांत्रिकीकरण केले आहे. कौशल्याने व संशोधक वृत्तीने गरजेनुसार यंत्रांत सुधारणा करून वेळ, पैसा, श्रम व मजुरीत बचत केली आहे. रुंद वरंबा, सोयाबीन कापणी, फवारणी आदी कामे त्यांनी सुलक्ष केली आहेत. माणिक रासवे शेतकरी नवनवीन पीक पद्धतींचा, सुधारित तंत्रांचा अवलंब करत आहेत. परंतु मजुरांची समस्या मात्र काही करून सुटायला तयार नाही. वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे पेरणीचे नियोजन बिघडतेच, शिवाय हाती आलेल्या पिकांचीही मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. परभणी जिल्ह्यातील बोरी (ता. जिंतूर) येथील मुरलीधर गोरे तसे दूरदृष्टी असलेले शेतकरी म्हणायला हवेत. त्यांनी काही वर्षांपूर्वीच शेतीत यांत्रिकीकरण आणण्यास सुरवात केली. यांंत्रिकीकरणाचे पुरस्कर्ते गोरे गोरे यांची एकत्रित कुटुंबाची ४५ एकर शेती. त्यात सोयाबीन, तूर, हरभरा, डाळिंब अशी विविध पिके आहेत. मजुरांच्या समस्येला ते कंटाळले होते. पण म्हणून शेतीपासून दूर जाणे शक्य नव्हते. यांत्रिकीकरण हा हुकमी पर्याय होता. सुरवातीला त्यात आर्थिक गुंतवणूक करावी लागत ...