Sunday 13 November 2016

संस्थेची उद्दीष्टे

शैक्षणिक उन्नती करणे.२. संघटना व ऐक्य घडवून आणणे व स्नेह वृध्दिंगत करणे.३. विद्यार्थी आश्रम चालविणे.४. गरीब व होतकरु विद्यार्थी – विद्यार्थीनीस वह्या, पुस्तके वाटप करणे.५. उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थीनींचा व मान्यवर व्यक्तींचा गुणगौरव करणे.६. ग्रंथालय स्थापून वाचनालये चालविणे.७. तालुक्याच्या ठिकाणी संघाच्या मालकीची इमारत बांधणे.८. स्थावर व जंगम मालमत्ता संपादन करणे आणि तिची संघाच्या आवश्यकतेनुसार कायेदेशीररित्या विल्हेवाट लावणे.९. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक व बौध्दिक क्षेत्रात विकास घडवून आणणे व प्रसार करणे.१०. सभा, सम्मेलने, परिषदा, शिबीरे व मेळावे भरवून लोकजागृती करणे.११. संस्कार विषयक कार्यक्रम सामुदायिक  पध्दतीने व कमी खर्चात पार पाडणे.१२. राष्ट्र पुरुष  जयंती,  पुण्यतिथी, मान्यवर दिवंगत कार्यकर्त्यांचा स्मृती दिन,.१३. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या सारखे राष्ट्रीय सण साजरे करणे.१४. सवॆ भाषेचे वर्ग चालविणे.१५.  अन्याय व जुलूम रितसर मार्गानी निवारण करणे आणि कायदेशिर सल्ला व मदत देणे.१६. साधे न्याय निवाडे देणे.१७.  सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक,  प्रश्नांचा अभ्यास करुन अहवाल प्रसिध्द करणे.१८. वर्गणी, देणगी व अन्य मार्गाने निधी उभारणे व त्याचा योग्य प्रकारे विनियोग करणे.१९. सामुदायिक शेती व उद्योग धंद्यास उत्तेजन देणे.२०. सहकारी तत्त्वावर पतपेढी स्थापन करणे.२१. आरोग्य शिबीर भरवून कुटूंब नियोजनाचा प्रसार करणे.२२. साक्षरतेचा प्रचार व प्रसार करणे.२३. अंधश्रध्दा व अनिष्ठ प्रथा नष्ठ करणे आणि समाजाला पोषक अशा चालीरिती निर्माण करणे.२४. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, वैज्ञानिक विचारसरणी निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.२५. संघाच्या हितासाठी आवश्यक त्या बाबी पार पाडणे.

No comments:

Post a Comment