माझ्या नजरेतून 15-मुलांना स्वातंत्र्य हवंय, पण पालकांना अजूनही नियंत्रण! घराघरात वाढतंय पिढ्यांमधलं अंतर...
मुलांना स्वातंत्र्य हवंय, पण पालकांना अजूनही नियंत्रण! घराघरात वाढतंय पिढ्यांमधलं अंतर... मुलांना मोठं होण्याची घाई आहे आणि पालकांना त्यांना अजूनही लहान ठेवायचं आहे. प्रेमाच्या नावाखाली नियंत्रण आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली मनमानी... या दोन टोकांमध्ये हरवत चाललाय कुटुंबातील संवाद! प्रत्येक आई-वडिलांचं एक स्वप्न असतं. आपली मुलं शिकावीत, मोठी व्हावीत, स्वतःच्या पायावर उभी राहावीत, आयुष्यात यशस्वी व्हावीत. त्यासाठी ते आयुष्यभर कष्ट करतात. स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवतात. मुलांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आपलं वर्तमान खर्ची घालतात. पण गंमत अशी आहे की, ज्या मुलांना आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतो, ती मुलं जेव्हा स्वतःचे निर्णय घेऊ लागतात, तेव्हा अनेक पालकांना त्यांचं स्वातंत्र्य खटकू लागतं. मुलांनी मोठं व्हावं, पण आपल्या विचारांपेक्षा वेगळा विचार करू नये. त्यांनी यशस्वी व्हावं, पण आपण ठरवलेल्या मार्गानेच. त्यांनी स्वतःचं आयुष्य घडवावं, पण प्रत्येक निर्णयासाठी आपली परवानगी घ्यावी. मग प्रश्न पडतो... आपण मुलांना घडवत आहोत की आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचं ओझं त्यांच्या...