Posts

Thought of the day

🌹।। *मनापासून शांतपणे वाचा* ।। 🌹 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• १ )■ जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. _______________________________ २ )■ आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका. _______________________________ ३ )■ नेहमी स्वतःसोबत पैज लावा, जिंकलात तर *आत्मविश्वास* जिंकेल, आणि हारलात तर *अहंकार* हारेल. _______________________________ ४ )■ पाण्याने भरलेल्या तलावात *मासे* किड्यांना खातात, आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर *किडे* माश्याना खातात. *संधी* सगळ्यांना मिळते. फक्त आपली *वेळ* येण्याची वाट पाहा_____! _______________________________ ५ )■ एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर, त्याच्या ओठांवर थोडसं *हसू* आणि डोळ्यात थोडसं *पाणी* नक्कीच आलं पाहिजे____ ! _______________________________ ६ )■ तु...

Our Program

Image
One day motivational program for Self Help Group women's in Shahada Nandurabar. 

सावित्रीबाई फुले

Image
कोण कुठली। कळी फुलांची जुनी विसर। नवीन पाही रीत जगाची। उत्सृंखल ही पाहुनिया मी । स्तिमित होई काळरात्र गेली। अज्ञान पळाले।। सर्वा जागे केले। या सूर्याने ।। शूद्र या क्षितीजी| जोतिबा हा सूर्य ।। तेजस्वी अपूर्व। उगवला।। स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या,अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या,पहिल्या महिला शिक्षिका आणि जोतीरावांना ‘ज्ञानसूर्य’ मानणाऱ्या, अठराव्या शतकातील प्रेरक व प्रेरणादायी कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

महात्मा ज्योतिबा फुले

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन......... क्रांतीज्योत महात्मा फुले ह्यांचा २८ नोव्हेंबर हा महानिर्वाण दिवस. जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्यांचा कैवारी म्हणजे महात्मा फुले. ह्या स्वाभिमानी नेत्याने देशाच्या सामाजिक जीवनात अशी काय उलथापालथ घडवली कि त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागली.त्याग,आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रतिष्ठा, सामाजिक व आर्थिक न्याय, शोषणविरहित समाजरचना, समान संधी या महान नैतिक मूल्यांवर आधारित समाजरचनेचे स्वप्न पाहिलेल्या आणि त्यासाठी आयुष्यभर संघर्ष केलेल्या महात्मा फुले यांचा आज १२९ वा स्मृती दिन “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” महिला शिक्षणाचे पुरस्कर्ते, सार्वजनिक सत्यधर्माचे व सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले. बहुजन समाजाला सामाजिक हक्क मिळून देण्यात त्यांनी आपले आयुष्य वेचले. गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, सार्वजनिक सत्य , अशा अनेक पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जनजागृ...

भारतीय संविधान

*भारतीय संविधान... जाणून घ्या १० महत्त्वाच्या गोष्टी.* *दीपक मोहिते*  देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा करण्यात येत आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हें. १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस.या निमित्ताने देशभात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात आलं आहे.या निमित्तानं जाणून घेऊया संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी... १) २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? -२६ नोव्हें. हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.कारण २६ नोव्हें. १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती. २) संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला? - संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस,या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं. ३) कसं लिहीलं गेलं संविधान? -आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं.यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. ४) संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते? -२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समि...

5 Reasons You Should Jump Rope Every Day

01/ 6 Start skipping rope from today! What is the first thought that comes to your mind when somebody says exercise or workout? Gym, right? This is not something uncommon. For most of the people getting leaner and fitter means shedding sweat in the gym and running miles on the treadmill. But if truly you want to stay fit and active then it is not necessary at all to go to the gym or get enrolled in any fitness classes. All you need is a jumping rope, some open space, and little motivation. Heavy and complicated pieces of equipment cannot always guarantee you a fit body, this can even be achieved simply by jumping rope at the comfort of your home. Jumping rope to stay fit is not something new, even the best athletes on earth do this because it's an incredible way to exercise. Here are five reasons why you should jump rope every day. 02/ 6 It improves your coordination Skipping a rope can improve the coordination between your eyes, feet, and hands. Whether you are keeping a close wat...

एक्सरसाइज करताना घाम येणं गरजेचं असतं की नसतं?

एक्सरसाइज करताना घाम येणं गरजेचं असतं की नसतं? एक्सरसाइज करताना घाम गेला पाहिजे असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण एक्सरसाइज करताना घाम येणं किंवा न येणं अनेकांच्या चिंतेचा व...