सांग सांग देवा सांग। हे शिक्षण नडेल काय ? गळ्या भोवती फास आवळून प्रश्न सुटेल काय? देवा सांग अभ्यासाचे ओझे झेपेल काय ? स्पर्धेच्या या रणामध्ये आयुष्य संपेल काय ? सांग सांग देवा सांग। हे शिक्षण नडेल काय ? गळ्या भोवती फास आवळून प्रश्न सुटेल काय? चढाओढी मध्ये वर्षे चालली सरत सुखाचे हे बालपण येईल का परत सांग सांग देवा सांग। हे शिक्षण नडेल काय ? गळ्या भोवती फास आवळून प्रश्न सुटेल काय? शाळेच्या या जेलमध्ये रोज नवा पेपर फुलांवरी का रे असे काट्याचे भार सांग सांग देवा सांग। हे शिक्षण नडेल काय ? गळ्या भोवती फास आवळून प्रश्न सुटेल काय?