भारतीय संविधान
*भारतीय संविधान... जाणून घ्या १० महत्त्वाच्या गोष्टी.* *दीपक मोहिते* देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा करण्यात येत आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हें. १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस.या निमित्ताने देशभात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात आलं आहे.या निमित्तानं जाणून घेऊया संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी... १) २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? -२६ नोव्हें. हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.कारण २६ नोव्हें. १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती. २) संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला? - संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस,या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं. ३) कसं लिहीलं गेलं संविधान? -आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं.यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. ४) संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते? -२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समि...