प्रिय सखे..
प्रिय सखे.. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शनिचा चौथरा तु ओलांडलास..अंबेच्या गाभारयातही तू प्रवेश केलास , त्याबद्दल तुझ कौतुक आहेच...पण खर सांगू का तुला चौथरा ओलांडायचा आहे . तो तुझ्या मनात वर्षानुवर्षे घट्ट रूतून बसलेल्या रूढीपरंपरांचा आणि पापपुण्याच्या भ्रामक कल्पनांचा... खरतर तथाकथित धर्माचा ठेका घेऊन देवावर अधिकार सांगणाऱ्यांना कदाचित या गोष्टीचा विसर पडला असेल की ज्या देवांना तू चालत नाहीस त्यांचा जन्म तुझ्याच उदरातून झालाय... पण तुझी लढाई समाजाशी नाही..सरकारशीही नाही..पुरूषांशी तर बिलकूल नाही....कारण तुझ्या शिक्षणाची मुहुर्तमेढ ज्यांनी रोवली ते ज्योतिबा , विधवा विवाह आणि संतती नियमनाची सुरूवात करणारे महर्षि आणि रघुनाथ कर्वे , केशवपन आणि सती सारख्या अनिष्ट प्रथांविरोधात लढणारे राजा राम मोहन राॅय. हिंदू काेड बिल आणून स्त्रीयांना स्त्रीपन मिळवून देनारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.या आणि अशा कित्येक पुरूषांनी समाजाच्या विरोधात जाऊन तुझ्या आयुष्याला अर...