सावित्रीबाई फुले जयंती
. 💐 *'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या...* 💁🏻♀️ सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी ही माहिती जाणून घ्या... 📌 *जन्म* :सावित्रीबाईंचा जन्म जानेवारी १८३१, नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे झाला. 📌 *विवाह* : सावित्रीबाईंचा विवाह ज्या सुमारास झाला त्यावेळेस बालविवाहाची परंपरा होती आणि त्यामुळे वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्या समवेत करून देण्यात आला. 📌 *शिक्षण* : त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहावाचावयास शिकविले. समाजाच्या भितीने ज्योतिबांच्या घरच्यांनी दोघांना घराबाहेर काढले परंतु ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले व त्यांचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करविला. समाजाच्या इतक्या विरोधानंतर देखील सावित्रीबाईंनी आपले शिक्षण ...