Sunday 3 January 2021

सावित्रीबाई फुले जयंती

.       
💐 *'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या...*



💁🏻‍♀️ सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी ही माहिती जाणून घ्या...



📌 *जन्म* :सावित्रीबाईंचा जन्म जानेवारी १८३१, नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे झाला.

📌 *विवाह* : सावित्रीबाईंचा विवाह ज्या सुमारास झाला त्यावेळेस बालविवाहाची परंपरा होती आणि त्यामुळे वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्या समवेत करून देण्यात आला.

📌 *शिक्षण* : त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहावाचावयास शिकविले. समाजाच्या भितीने ज्योतिबांच्या घरच्यांनी दोघांना घराबाहेर काढले परंतु ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले व त्यांचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करविला. समाजाच्या इतक्या विरोधानंतर देखील सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण केले.

✔️ *सावित्रीबाई फुले यांचे कार्य*

● १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.

● इ.स. १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या.

● इ.स. १८५४ साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.

● इ.स. १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले.
५. १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.

● इ.स. १८९३ साली सासवड येथे झालेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषविले.

● पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. 

📖 *सावित्रीबाई फुले यांची प्रकाशित पुस्तके*

📘 काव्यफुले (काव्यसंग्रह)
📘 सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
📘 सुबोध रत्नाकर
📘 बावनकशी

🎼 *सावित्रीबाई फुले यांचे काही काव्य*

🖋️
विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन

🖋️
कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृंखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई

🖋️
रूप तियेचे करी विच्छिन्न
नकोसे केले तिजला त्याने
शोषून काढी मध तियेचा
चिपाड केले तिला तयाने

🖋️
काळरात्र गेली। अज्ञान पळाले।।
सर्वा जागे केले। या सूर्याने ।।
शूद्र या क्षितीजी।
जोतिबा हा सूर्य ।।
तेजस्वी अपूर्व। उगवला।।

🌍 *२०१७ साली गुगलतर्फे अभिवादन* : ३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमीत्त गूगलने त्यांच्या महान कार्याची दाखल घेत डूडल प्रसिद्ध करुन अभिवादन केले होते.

👉 *सावित्रीबाईंचे निधन*

1897 ला पुण्यात महाभयंकर अशी “प्लेगची” साथ सुरू झाली. सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा त्या करीत राहिल्या अश्यातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

No comments:

Post a Comment