*पाणी गळ्यापर्यंत आले आहे..* बरेच दिवस झाले कोरोनाच्या बातम्या, विनोद वाचतोय. सध्या इटलीमध्ये एका दिवसाला 800 लोक मरत आहेत. संपूर्ण देश lockdown अवस्थेत आहे. प्रेतावर अंत्यविधी करण्यासाठी मिलिटरी बोलवावी लागत आहे. आपला मुलगा मुलगी पत्नी पती आई वडील कुठे अॅडमिट आहेत? ते जिवंत आहेत की मेले? हे सुध्दा कळू नये इतकी अनागोंदी आहे तिथे. आपण इटलीच्या फक्त 15-20 दिवस मागे आहोत आणि आपला आलेख पाहता त्याच, कदाचित त्यापेक्षा गंभीर दिशेने वाटचाल करत आहोत. इटलीमध्ये 25 फेब्रुवारीला आपल्या इतक्या म्हणजे 300 positive केसेस सापडल्या होत्या,त्या 21 मार्च पर्यंत 54,000 इतक्या झाल्या. इटलीची लोकसंख्या आपल्यापेक्षा 20 पट कमी आहे. त्यांची आरोग्यसुविधा आपल्यापेक्षा सक्षम आहे, लोकसंख्येच्या मानाने आपल्यापेक्षा जास्त डॉक्टर्स, दवाखाने आहेत त्यांच्याकडे. त्यांचे सोशल interaction आपल्यापेक्षा कमीच असते. मग विचार करा, आपण सध्या जो हलगर्जीपणा दाखवतोय त्यामुळे भारतात किती भीषण परिस्थिती होऊ शकते..? कोरोना एवढा घातक ठरण्याचे कारण काय? 1. Modus Operandi: या विषाणूची कार्यपद्धती इतरांपेक्...