Posts

कृषि विभाग

कृषि विभाग उ द्देश  कृषि उत्पादन वाढीसाठी सधन शेती पध्दतीद्वारे गुणवत्तापूर्ण बियाणे, खते,किटकनाशके उपलब्ध करून देणे, पीक प्रात्यक्षीके, प्रक्षेत्र  भेटी, प्रचारसभा, चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांच्या सोबत कृषि फलोत्पादन व जलसंधारण, निर्यातवृध्दी व कृषि प्रक्रिया  उद्योगांना प्रोत्साहन अश्या अनेकविध योजना राबविण्यांत येत आहेत.  रचना सुलभ संपर्कासाठी प्रत्येकी तीन ते चार खेडयांसाठी एक कृषि सहायकाचे पद देण्यांत आलेले आहे. यावर मंडलस्तरावर मंडल कृषि  अधिकारी यांचे नियंत्रण असते. प्रशासकीय कामकाज, इतर विभागांशी संपर्क, संनियंत्रण व प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी सोयीसाठी  तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी, उपविभाग स्तरावर उप विभागीय कृषि अधिकारी, जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि  अधिकारी व संभागस्तरावर विभागीय कृषि सह संचालक यांची कार्यालये आहेत. राज्यस्तरावर कृषि आयुक्तालयात मृदसंधारण,  फलोत्पादन, विस्तार, निविष्ठा व गुणनियंत्रण , सांख्यिकी, संनियंत्रण व मुल्यमापन, नियोजन व अंदाज हे विभाग कार्यरत आहेत, याश...