गुगलमध्ये माहिती शोधताना
गुगलमध्ये माहिती शोधताना गुगल.कॉमवर आपण बर्याचवेळा निरनिराळ्याप्रकारची माहिती शोधतो आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी गुगल.कॉमवर अनेक (हजारो) वेबसाईटची यादी समोर येते. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपणास अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठिण जाते आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय नसतो. मग विनाकारण खुप वेळ वाया जातो. अशावेळी गुगलचा कंटाळा येतो. कधीकधी गुगल.कॉमचा हाच स्वभाव अनेकांना आवडत नाही. विचारलेल्या माहितीची असंख्य पाने दाखविल्यावर त्यांना राग येतो. यावेळी गुगल.कॉमला नावे ठेवण्यापेक्षा आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर शोधायला गुगल.कॉमला मदत होते आणि परीणामी आपला वेळही वाचतो. गुगल.कॉमवर माहिती शोधताना कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो. १. आपल्या प्रश्नामध्ये ' + ' चिन्हाचा वापर करावा : समजा गुगल.कॉमवर आपणास मोबाईलची हिस्ट्री (म्हणजेच मोबाईलचा इतिहास) शोधायचे असल्यास गुगल.कॉम ' Mobile + History ' असे सर्च केल्यास गुगल.कॉम हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो. २....