Tuesday, 5 April 2016

रेनगन सिंचन

पिकांना पाणी देण्यासाठी आधुनिक व फायदेशिर पद्धत - रेनगन सिंचन
प्रचलित सिंचनाच्या पद्धती :-
१) सारे पद्धत :-
या पद्धतीचा ज्वारी, गहू, करडई, हरबरा, कापुस, भूईमूग इ. साठी आपण वापर करतो .
२) वाफे पद्धत:-
कांदा, लसुण, पालेभाज्या इ. या पिंकासाठी आपण वापर करतो .
३) सरी वरंबा पद्धत:-
मका, कापूस, ऊस, फळभाज्या इ. पिकांसाठी आपण ही पद्धत वापरतो .
४) आळे पद्धत :-
केळी तसेच विविध फळझाडांसाठी आपण आळे पद्धतीचा वापर करत असतो .
या झाल्या आपल्या प्रचलित व पारंपारिक सिंचन पद्धति यामध्ये जास्त पाणी व खुप सारे मनुष्यबळ आपल्याला लागते.
वाढत्या दुष्काळी परिस्थितीकडे बघता पाण्याची बचत करणे खुप गरजेचे झाले आहे, त्यासाठी नविन आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करायला हवा
आधुनिक सिंचन पद्धती :-
१) ठिबक सिंचन

या पद्धतीमध्ये प्रत्येक झाडाला थेट मुळांच्या जवळ थेंब थेंब पाणी दिले जाते व  ही पद्धत पुर्णपणे स्वंयचलित करता येते ,त्यामुळे कमी पाणी तर लागतेच व मनुष्यबळाची सुद्धा गरज भासत नाही .
ह्या पद्धतीमध्ये आपन ६०-७० % पाण्याची बचत करू शकतो .
२) तुषार सिंचन :-
ही पद्धत सुद्धा कमी पाणी लागणारी असुन ५०-६० टक्के पाणी यामधुन आपण वाचवू शकतो, अवर्षणसदृश्य भागात पाणी वाचवायला याचा खुप फायदा होतो.जमिन समानपातळीत नसल्या ठिकाणी याचा आपण वापर करू शकता.
तसेच तिसरी व जास्त प्रचलित नसलेली सिंचन पद्धत म्हणजे
रेनगन सिंचन पद्धत होय.
रेनगन म्हणजे नेमक काय ? व त्याचे फायदे काय ? असे बरेच पश्न पडणे आपल्यासाठी साहजिक आहे त्यासाठी
रेनगन सिंचन पद्धत म्हणजे काय ?
तुषार सिंचनासारखेच पण तुषार संचापेक्षा मोठा संच, एकाच वेळेस जास्त  क्षेत्र भिजविता येणारी, पिंकाच्या  पाणावरिल धुळ साफ करणारी
तसेच कमी पाणी व कमी मनुष्यबळ लागणारी सिंचन पद्धत होय .
उपलब्ध असलेल्या विविध आकाराचे  मॉडेलच्या साह्याने एक संचाने साधारणपणे १०० ते ४०० फूट इतक्‍या लांब पाणी देता येते, ८००-१००० लिटर प्रति मिनिट या प्रवाहाने एका जागेवरून पाणी फवारू शकतो.
संचाचा 3 ते 3.5 कि. ग्रॅम/सें. मी.2 हा दाब निर्माण करण्यासाठी 7.5 ते 10 अश्‍वशक्तीचा( HP)पंप वापरावा लागतो.
रेनगन सिंचनाचे फायदे :-
पिकांवर पावसाप्रमाणे पाणी पडत असल्यामुळे पाणांवरील धुळ साफ होवून प्रकाश संशश्लेषणाचा वेग वाढुतो त्यामुळे झाडांची वाढ झपाट्यावे वाढते व परिणामी भरघोस उत्पादन आपल्याला मिळते,
१) पाण्याची कमतरता असलेला भाग किंवा कमी आवक असलेले श्रोत असल्यास कमी वेळात जास्त क्षेत्र भिजवण्यासाठी रेनगन चा वापर करता येतो .
२) विजेचा उपलब्धता व भारनियमामध्ये कमी वेळात आपण पाणी देवू शकतो त्यामुळे खुपच फायदेशिर .
३) पिकांवर फवारले जाणारे पाणी पावसाच्या सरी सारखे रिमझीम पडते .
४) तुषार सिंचन संचापेक्षा सिंचनासाठी लागणारे मनुष्यबळ व कालावधी यामध्ये बचत होते.
५) नायलॉन पाईपचा वापर केल्यास एक किंवा दोन रेनगनमध्ये संपूर्ण शेत भिजविता येते.
६)  पिकाच्या गरजेइतकेच पाणी
प्रवाह नियत्रणकरून देता येते .
७) पाण्याचा होणारा अनावश्‍यक अतिवापर  टाळता येतो व पाण६्याची बचत होते .
८) रेनगन सिंचनाखाली शेतातील ऊसाचे  पाचटाचे कंपोस्ट खत लवकर तयार होण्यास मदत होते त्यामुळे जमिनिची प्रत सुधारते व उत्पन्न वाढीस मदत होते .
९) रेनगन च्या पाण्यात विविध विद्राव्य (फॉलीअर ) खते देता येतात त्यामुळे मनुष्यबळ कमी लागते व लवकर काम होते .
१०) रेनगन सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीच्या तुलनेत खर्च कमी येतो
व १५-२० हजार रू मध्ये एक हेक्टर श्रेत्र आपण भिजवू शकतो .
- रेनगन संच वजनाने हलका असल्याने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या हलवता येतो.
-पीव्हीसी अथवा लोखंडी पाईपला रेनगन सहजपणे जोडता येवू शकते .
भाजीपाला,केळी,ऊस,द्राक्ष,कांदा,बटाटा,चहा,कॉफी,कापुस,गहू,हरबरा,तृणधान्य,भूईमूग,गळीतधान्य इ. पिकांसाठी रेनगन चा वापर करतात.
वापरतांना घ्यायची काळजी :-
-रेनगन चालु करतांनी पाईप लाईन व्यवस्थित तपासुन व फ्लश करून घ्यावी .
-ट्रायपॉड स्टॅंण्ड व्यवस्थित अचुक बसवावा  .
-बायपास ॲसेंब्लीचा वापर दाब नियत्रणासाठी करावा सुरूवातिला दाब कमी ठेवावा .
-रेनगनचे पार्टस चांगले साफ करावे साफ करतांनी सुती कापडाचा वापर करावा खरबडीत कापड वापरू नये .
-रेनगनला तेल किंवा कुठलेही प्रकारचे ऑईल लावू नहे .
-स्टॅंण्ड एका जागेवरून दुसरीकडे हलवतांना काळजी घ्यावी दगडावर किंवा टनक जागेवर पडणार नाही याची दक्षता घ्यावी .
-पाणी देणे झाल्यावर रेनगन व्यवस्थित स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी.

No comments:

Post a Comment