Thursday 28 April 2016

कृषि क्षेत्रात वाढतोय भोंडूबाबांचा वावर

👳🏽कृषी क्षेत्रात वाढतोय "भोंदूबाबांचा" वावर👳🏽

🌾शेतकरी बंधूंनो नमस्कार🙏🏻....

सामाजिक क्षेत्रात भोंदूबाबा आहेत हे आपणास माहीतच आहे. पण आता पावन कृषिक्षेत्रात सुद्धा भोंदूबाबा आणि अंधश्रद्धा वाढत आहे.. अध्यात्मिक शेती, आणि झेरोबजेट शेती या काही पद्धती मांडून शेतकाऱ्यांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचे काम हि जनता करत आहे... कृषीऋषी सारख्या स्वयंघोषित पदव्या लावून शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन फुकटची शेती शिकवण्याचे काम काही बुद्धिजीवी करत आहेत. देव सर्व करेल तुम्ही हात जोडून बसा एक गाय 30 एकर शेत जागवेल अश्या भंपक कल्पना ह्या लोकांकडून पसरवल्या जात आहेत. गाईच्या शेन गोमूत्राचा उपयोग शेतीत 100% आहे त्याबद्दल दुमत नाही पण हि लोक ज्या पद्धतीनं त्याचा उपयोग करा अस सांगत आहेत हे चुकीचं आहे.. यांचं काम एकच शिबीर आयोजित करायची शेतकऱ्यांकडून 4-5 दिवसाचे 700-800 ₹ उकळायचे त्यांच्या माथी पुस्तकं, CD's मारायच्या आणि पैसा कमवायचा हा यांचा व्यवसाय आहे... विडिओ आणि पुस्तक वाचून जर शेती करता आली असती तर आज शेतकरी राजा असता.. हे म्हणजे रेसिपी पाहून एखादा पदार्थ तयार केल्या सारखे झाले..
♻शुन्य खर्चाची शेती किंवा नैसर्गिक शेती हे एक मृगजळ♻

शेती रासायनिक, नैसर्गिक अथवा सेंद्रिय असो, काहीही खर्च नसलेली शेती या जगात कोठेही अस्तित्वात नाही. हे शेतकऱ्यांना दाखवन्यात येणारे एक मृगजळ आहे. शेती हा एक व्यवसाय आहे आणि व्यवसाय करण्यासाठी गुंतवणूक कराविच लागते. प्रत्येक बाबतीत शासनावर अवलंबून न रहता शेतीत विविध प्रयोग केले तर उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणात कमी करता येतो, नफ्यात वाढ होते. आज हे बळीराजाला सांगण्याची गरज आहे.. पाळेकर माझी पद्धत किती चांगली हे सांगण्याच्या नादात दुसरे किती वाईट, चुकीचे आहे हे सांगण्यात मग्न आहेत..शेतीचा उगमच जणू सेंद्रिय पद्धतीतून झाला आहे हे महाशय त्यालाच चुकीचं ठरवत आहेत...

कृषिऋषींच्या म्हणण्या नुसार...
🌾सरळ वाण वापरा... संक्ररित वाण का काढतात याची त्यांना माहीती नसावी... शेवग्याचे पीकेएम१ व पीकेएम२ हे कोईमतूर येथून निघालेले संक्ररित वाण आहेत, हे ही त्यांना माहीती नाही... विद्यापीठांची वाण वापराची आणि विद्यापीठांनाच नाव ठेवायची, कृतघ्नपणा नाही का हा..? संकरित वाण इतकेच वाईट आहेत तर पालेकर स्वतःची वाण का काढत नाहीत?
🌾शेतात ड्रीप पद्धत वापरू नका असे मल्चिंग वापरू नका, पाळेकर म्हणतात. सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेतून जात आहे मग अश्या पद्धती वापरल्याचे पाहिजेत तर अश्या पद्धतींना पळेकरांचा विरोध का?

🌾पाळेकर कायम प्रदूषणासाठी शेतकऱ्यांना जबाबदार धरतात अहो याच गोष्टी मोठ मोठ्या कारखानदारांना सांगून बघा ऐकतात का ते? लोकसंख्येच्या ७०% लोक शेती करतात आणि इतर ३०% लोकसंख्या ७०% प्रदूषण करते, हे सिद्ध झालेले आहे... किंबहुना या प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका शेतकरयांना बसत आहे... मग पालेकर प्रदूषणासाठी शेतकरयांना कसे जबाबदार धरत आहेत... ३०% प्रदूषण करणारा शेतरी दोषी म्हंटला तर ७०% प्रदूषण करण्याचे काय...? या पृथ्वीतलावर सर्वात हिरव्या वनस्पती जर कोण पैदा करत असेल तर तो माझा बळीराजा आहे तो हवेतील प्रदूषण कमी करण्यात पुढं आहे हे नाही का दिसत पाळेकरांना..
हरितक्रांती जर झाली नसती तर आजच्या लोकसंख्येच्या १०% लोकसंख्याही पोसणे आपणास शक्य होते का? zbnf च्या उत्पन्नातून आपण देशाची लोकसंख्या पोसू शकतो का? यामुळे शेतीमाल आयात करावा लागला तर देशाच्या अर्थशास्ञाचे काय होईल? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करा..

👉🏻खरं काय****
जपानच्या शास्ञज्ञाने ही संकल्पना मांडलेली, ती जागतिक पातळीवर अमान्य झाली... सेंद्रीय शेती व जैविक शेतीतील निविष्ठांमध्ये नैसर्गिक शेती घुसवून हे zbnf चालु करण्यात आलेल आहे... आणि हे चालाव म्हणून आता पालेकर सेंद्रीय शेतीला नाव ठेवताहेत. ज्या जमिनीवर संशोधन करून पद्मश्री मिळवला असे सांगतात ती त्यांची जमिन पडीक आहे... ताक, मीठ, राख, दारू,फवारुण पाण्याविना शेती होणे शक्य आहे का? राजकीय लागेबंदे असल्याने त्यांना विरोध होत नाही आणि झाला तरी तो दाबण्यात येतो.

👉 या सर्व गोष्टींवर एकच पर्याय**
एकात्मिक पद्धतीने शेती करा.. सगळ्या पद्धतीचा वापर करा. जमिनीचे आरोग्य संभाला..तसेच पर्यावरणाचे सुद्धा..शेती कड़े व्यवसाय म्हणून पहा.. जगन्यासाठी म्हणून नको..
मित्रानो वरील प्रत्येक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारून पहा काय उत्तर येतंय.. तुम्हाला जे योग्य वाटतंय तेच करा.. एकात्मिक पद्धती वापरा आणि भरघोस उत्पादन घ्या. भोंदूगिरी पासून स्वतः वाचा आणू दुसऱ्याला सुद्धा. या बाबतीत काहीही शंका असल्यास खालील नं वर संपर्क साधा आपल्या प्रत्येक शंकेचे समाधान केले जाईल..

|| अन्नदाता सुखी भवः||

No comments:

Post a Comment