Wednesday 27 April 2016

हळद व् अद्रक लागवड


हळद व् अद्रक लागवड व योग्य सहजीवन सापळापिके....

1) जमीन ही मध्यम व निचऱ्याची असावी. शक्यतो पानी पकडनारी नसावी.
2) मे महिन्याच्या सुरुवातीला 3 फुट अंतरावर बेड करावेत 2 बेड मध्ये 1.5 फुट अंतर असावे, तसेच मधील अंतराचि खोली ही कमीत कमी 1.5फुट असावी
3) बेड च्या मधोमध ड्रिप लाइन टाकून घ्यावी. ड्रिप वापरल्यास वाफसा चांगला राहतो. तसेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
4) एकरी 400 किलो घनजीवामृत शेवटच्या पाळीत द्यावे.
5) लागवडी साठी योग्य काळ 15 मे ते 15 जून सर्वोत्तम
6) बेने हे कमीत कमी 30 ग्राम वजनाचे असावे. zizzag पद्धतीने 9 इंच अंतरावर एक एक बेने लावावे. तत्पूर्वी बेन्यास बिजसंस्कार करावे.
7) तसेच 10 X 10 अंतरावर गावरान एरंडी किंवा शेवगा (सुधारित संकरित नव्हे) लावावा.
अथवा नऊ फुटावर बेडवर शेवगा किंवा तुर लावावी
सरीच्या दोनी बाजुला मिरची लावा
8) एकरी 700 ते 800 किलो बेने वापरावे
9) पूर्ण बेने लावणे झाल्यावर पाचटाचे आछादन करावे जेनेकरुण तीव्र उष्णतेचा बेन्यावर परिणाम होणार नाही
10) एकरी 200 लि. जीवामृत महिन्यातून दोनदा द्यावे. तसेच जीवामृत व् दशपर्णी अर्क यांची आलटुन् पालटुन फवारनि करावी. थंडीच्या दिवसात आंबट ताक व सप्तधान्यंकुर याची महिन्यातून 2 दा फवारनि घ्यावी जेने करुण करपा प्रतिबन्ध होईल
10) पानी हे वाफसा स्थितित ठेवावे
अंदाजे 9-10 महिन्यात काढणियोग्य होईल. जीवामृताचा वापरामुळे बुरशि जन्य रोग येत नाहीत. अतिशय चांगली व् सुगन्धित चव मिळते

No comments:

Post a Comment