Sunday, 4 July 2021

दातदुखी वर रामबाण उपाय

*दातदुखी वर रामबाण उपाय-*

साधारणपणे दात किडल्याने दातदुखी उद्भवते. आहार, बदलती जीवनशैली यासारख्या कारणांसह मानसिक ताणतणावांमुळेही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेकजण दातांच्या समस्यांनी हैराण आहेत. डॉक्टरांकडे जाण्याआधी काही घरगुती उपाय केल्यास दातांच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

 *१)  मिरे पावडर* 
 एक चतुर्थांश चमचा मीठात एक चिमटभर मिरे पावडर मिसळून दुखणाऱ्या भागात लावावे. आराम मिळेल.

 *२)  मोहरीचे तेल* 
तीन ते चार थेंब मोहरीच्या तेलामध्ये एक चिमटभर सैंधव मीठ टाकावे व दात आणि हिरड्यांना मसाज करावा. आराम मिळेल.

 *३) लिंबु* 
लिंबात व्हिटामिन सी असते. जो दात दुखत आहे. तेथे लिंबाच्या चकत्या ठेवल्यानेही आराम मिळते.

 *४)  बटाटा* 
दात दुखीसोबत सुज असेल तर बटाटा सोलून त्याच्या चकत्या कारव्यात. दुखणे असलेल्या भाग़ावर १५ मिनटांपर्यंत ठेवावे. आराम मिळेल.

 *५) पेरुची पाने* 
जो दात दुखत असेल तेथे पेरुची पाने ठेऊन पाने चावावीत. आराम मिळेल. तसेच एक कप पाण्यामध्ये ही पाने उकळून घ्या. या पाण्याचा माउथवॉश प्रमाणे वापर केल्याने आराम मिळेल.

 *६)  पुदीना* 
पेपरमेंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुदीनाच्या तेलाचे काही थेंब दुखत्या दातावर टाकल्याने आराम मिळेल.

 *७)  तेजपत्ता* 
तेजपत्ता प्राकृतिक वेदनानाशक आहे. दुखण्या पासुन त्वरित आरामासाठी त्याचा वापर केला जातो. त्यात अनेक आौषधींचे गुणधर्म आहेत. दातांची सडन आणि दुर्गंधी ते दूर करते.

दुखणाऱ्या  भाग़ावर १५ ते २० मिनिटांपर्यंत बर्फ़ लवावा. अनेक़दा असे केल्याने दात दुखीपासून सुटका मिऴते.

No comments:

Post a Comment