Thursday 8 March 2018

8 मार्च

🌸जागतिक महिला दिन 8 मार्च ....🌸

■महिला ना महिला बोलून आपण माणूस नाही ह्याचा भेदभाव इथूनच सुरू होतोय...

■शेतीचा शोध लावणारी स्त्रीसंस्कृती असणाऱ्या स्त्रीप्रधान भारत देश ...पुरुषप्रधान कधी व का झाले ?? भारतात कुठेही गेले तरी उंच डोंगरावर देवीचेच मंदीर का आढळतात?? एकेकाळी लढाऊ नेतृत्व करणाऱ्या स्त्रियां गुलाम का झाल्या ??

■ शिक्षणापासून वंचित ,सती,बालविवाह ह्यासारख्या प्रथामुळे स्त्रियांचे शोषण होत राहिले ..कोणत्या कायद्यानुसार त्याना गुलाम ठरवलं गेले ....??
संविधानिक अधिकार नुसार स्त्री - पुरुष समानता वागणूक मिळून आरक्षणाच्या आधारावर आज प्रधानमंत्री,राष्ट्रपती,शास्त्रज्ञ, वकील ,पायलेट ,डॉक्टर, अंतराळ पाऊल ठेवणारी महिला म्हणून ख्याती मिळाली.

■आजही स्त्री स्वतंत्र आहे का ..? अधिकार आहे का ..? प्रत्येक गोष्ट पुरुषाला विचारून करणे व त्याच्या धाकाखाली राहून प्रत्येकगोष्टीत त्याचा हो ला हो बोलणे ....त्यात कसले आले स्वतंत्र..!

■आजही शिकलेल्या स्त्रिया बुवा बाबाच्या आहारी जातात तेव्हा खात्री होते आजही आपण हजारो वर्षे मागे आहोत.सावित्रीच्या शिकलेल्या लेकी जेव्हा वटसावित्री पुजतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते.

★ तु  होऊ नको सीता त्या रामाची तुला लोक लाचार बोलतील .
तु हो माँ जिजाऊ शिवबाची लोक तुला राष्ट्रमता राजमाता बोलतील...!

★ तु होऊ नको द्रौपदी पांडवांची लोक अबला बोलतील
तु हो ज्योतीबाची लोक तुला सावित्रीमाई बोलतील ...!

विशाल पाटील ✍🏿

जय रमाई
जय जिजाऊ
जय अहिल्या
जय सावित्री
जय संविधान

No comments:

Post a Comment