Monday 12 February 2018

Thought of the day

*सात कोड्यांना गौतम बुध्दांनी दिलेली उत्तरं*
     🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

*या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??*
  *सगळे शिष्य एका सुरात म्हणाले, तलवार...*
    *गौतम बुध्दांनी उत्तर दिले.. जीभ..*
    *कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसर्याचा अपमान करतो, दुसर्याला दुखावतो,  दुसर्याच्या भावनांना धक्का पोचवतो.*
          🌟🌟🌟🌟
     *या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??*
    *काहीजण म्हणाले, सूर्य, चंद्र, आकाशगंगा...*
    *गौतम बुद्ध म्हणाले..भूतकाळ.*
    *माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणार्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे.*
             🌟🌟🌟🌟
    *या जगातील सगळयात मोठी गोष्ट कोणती..???*
     *कुणीतरी सांगितले की, पृथ्वी, पर्वत, सूर्य.*
    *बुध्द म्हणाले, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे..हाव.*
     *लोक दुःखी होतात त्यामागील कारण त्यांच्या मनातील न संपणारी हाव. ही हाव पूर्ण करण्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. त्यामुळे हाव करताना काळजी घ्या.*
         🌟🌟🌟🌟
     *पृथ्वीवर सगळ्यात वजनदार वस्तू कोणती...???*
    *कुणीतरी उत्तर दिलं... पोलाद, लोखंड, हत्ती.*
    *बुध्द म्हणाले, सगळ्यात कठिण वस्तू... वचन.*
    *वचन देणे सोपे असते पण ते पाळणे कठिण.*
           🌟🌟🌟🌟🌟
    *पृथ्वीवरील सगळ्यात हलकी वस्तू कोणती..??*
    *कुणीतरी म्हणाले.. कापूस, हवा, धूळ, पाने.*
   *गौतम बुध्द म्हणाले, सगळीकडे मी आणि मीपणा हलका असतो.*
      *पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणार्यांकडे पहा. काही जणांनाच हा मीपणा सोडता येतो.*
           🌟🌟🌟🌟
    *पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती..???*
    *काही जणांनी सांगितले, आई, वडिल, मित्र, नातेवाईक.*
    *गौतम बुध्द म्हणाले, माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे 'मृत्यू'.*
    *कारण कुठल्याही सेकंदाला मृत्यू येण्याची शक्यता असते.*
         🌟🌟🌟🌟
    *शेवटचा प्रश्न..*
    *या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती...??*
     *लोक म्हणाले, खाणे, झोपणे, फिरायला जाणे.*
     *गौतम बुध्द उत्तरले, सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देणे.*
         🌟🌟🌟🌟

No comments:

Post a Comment