टरबूज : टरबुजाचे विविध सुधारित आणि संकरित वाण.*
टरबूज फळात सर्वसाधारणपणे वाणानुसार १२ ते १५ टक्के साखरेचे प्रमाण असते. गोलाकार आणि लांब वर्तुळाकार आकार आणि हिरवे फिकट पांढरे पट्टे आणि गर्द हिरवे असे दोन प्रमुख रंग पाहावयास मिळतात. वाणानुसार बियांचा आकार आणि वजन वेगवेगळे असते. बियाणे खरेदी करताना वाण आणि बियाणे उत्पादक कंपनी भरवशाची असल्याची खात्री करून घ्यावी. पॅकिंग वरील चित्र आणि प्रत्यक्ष फळ तसेच असेल असे नसते. बरेचदा शेतकरी त्या चित्राला/फोटोला पाहून भुलतात. शुगर बेबी, शुगर क्वीन, अर्का माणिक, मधू, मिलन, अमृत, सुपर ड्रॅगन, शुगर किंग, बादशहा या नावाने बियाणे मिळते. कोकोपीट मध्ये रोपे तयार करून रोप १५ दिवसांचे झाल्यानंतर लागवड करावी.
No comments:
Post a Comment