Tuesday 26 September 2017

बुरशीनाशकाच्या कार्यपद्धती नुसार ....

​​​​

*_बुरशीनाशकाच्या कार्यपद्धतीनुसार_*

*(1) प्रतिबंधक /संरक्षक बुरशीनाशके*
संरक्षण बुरशीनाशक फवारणी केलेल्या झाडाच्या पृष्ठभागाचे बुरशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करते अशा प्रकारची बुरशीनाशके शक्यतो रोग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून रोग येण्यापूर्वी वापरली जातात. उदा. काॅपर ऑक्सीक्लोराईड, झायरम, सल्फर, मॅन्कोझेब.

*(2)नायनाट करणारी  ( Eradicant ) उपायात्मक ( Curative  )बुरशीनाशके*
रोगाची लागण झाल्यावर उपायात्मक  ( Curative ) बुरशीनाशकची फवारणी केली आसता ते बुरशीच्या धाग्याचा /बीजाणुंचा बंदोबस्त करते आणी रोगाचा पुढील प्रसार व त्यापासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करते. उदा. कॅप्टन. .

*(3)आतंरप्रवाही  (Systemic) बुरशीनाशके*...
आतंरप्रवाही ओषधी फवारणी केल्यावर पेशींव्दारे झाडाच्या सर्व भागामध्ये पसरले जाते. अशाप्रकारच्या बुरशीनाशकाची फवारणी केल्यावर संपुर्ण झाड विषारी बनते व उत्तम नियंत्रण होते उदा. काब॔न्डाझिम. हेक्झाकोनॅझोल, थायोफेनेट, मिथाईल, ईत्यादी.
बुरशीनाशकामध्ये असलेल्या

*_रासायनिक घटकानुसार_*

*(1)ताम्रयुक्त बुरशीनाशके :*
उदा. 
काॅपर ऑक्सीक्लोराईड, बोडोॅ मिश्रण

*(2) गंधकयुक्त बुरशीनाशके :*
उदा.
गंधक, कॅराथेन, डिनोकॅप

*(3)डायथिओकाबाॅमेट बुरशीनाशके :*
उदा.
झायरम, थायरम, मॅन्कोझेब.

*(4)हिट्रोसायक्झिमाईड, नायट्रोजिन्स बुरशीनाशके :*
उदा . कॅप्टन

*(5)काबोक्झिमाईड बुरशीनाशके:*
उदा. कारबोक्झिन , ऑक्झिकारबोक्झिन. .

*(6)बेन्झिमिडाझोल बुरशीनाशके :*
उदा . काब॔न्डाझिम, बेनोमिल.

*(7)अॅसिलॅलॅनिन बुरशीनाशके :*
उदा . मेटालॅक्झिल.

*(8)मारफोलिन बुरशीनाशके :*
उदा . ट्रायडेमाफ॔.

*(9) फाॅस्फोनेट बुरशीनाशके :*
उदा. फाॅसेटिल ए. एल

*(10) पायरीमिडीन बुरशीनाशके :*
उदा. फेनारिमाॅल.

*(11)ट्रायझोल बुरशीनाशके:*
उदा . बिटरटॅनाॅल, हेक्झाकोनॅझोल, पेनकोनॅझोल, प्राॅपिकोनॅझोल. . . . ई

No comments:

Post a Comment