🍇पावसाच्या स्थितीनुसार करा द्राक्ष छाटणी🍇
✍डॉ. एस. डी. सावंत
सर्व द्राक्ष विभागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यानंतर दोन ते तीन दिवसांची उघडीप मिळेल. त्यानंतर पुन्हा २५ आणि २६ तारखेला पावसाची शक्यता दिसते. हा पाऊस सर्वसाधारणपणे पुणे, सांगली, सोलापूर भागांमध्ये जास्त व नाशिक भागामध्ये कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये पुढील दोन दिवस पूर्व व उत्तर भागांमध्ये जास्त पाऊस होईल.
सर्व द्राक्ष विभागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यानंतर दोन ते तीन दिवसांची उघडीप मिळेल. त्यानंतर पुन्हा २५ आणि २६ तारखेला पावसाची शक्यता दिसते. हा पाऊस सर्वसाधारणपणे पुणे, सांगली, सोलापूर भागांमध्ये जास्त व नाशिक भागामध्ये कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पुढील दोन दिवस पूर्व व उत्तर भागांमध्ये जास्त पाऊस होईल.
सोलापूरमधील पंढरपूर, बार्शी आणि जवळपासचा भाग आणि लातूर, उस्मानाबाद या भागांमध्ये २५ तारखेनंतर पाऊस होण्याची जास्त शक्यता आहे. नानज, वैराग, बार्शी भागांतील पाऊस शुक्रवार-शनिवारपर्यंत सुरू होईल, तर उस्मानाबाद, लातूर भागांतील पाऊस पुढील बुधवारनंतर येण्याची शक्यता आहे.
सोलापूरजवळील होटगी परिसरामध्ये शनिवार-रविवारपासून एक-दोन दिवस चांगला पाऊस होईल. बोरामणी भागामध्ये पुढील बुधवारी पाऊस होईल.
🌧सांगली भागामध्ये कवठे महांकाळ, सावळज, पळशी, खानापूर, विटा, तासगांव या भागांमध्ये रविवारनंतर काही दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
आरग, बेडग, कागवाड, शिरगुप्पी या भागांमध्येही या पावसाची शक्यता आहे.
पुणे विभागातील जुन्नर भागामध्ये शुक्रवार-शनिवारपर्यंत हलका पाऊस होईल, त्यानंतर पाऊस होण्याची शक्यता नाही. यवत, बारामती, पाटस, सुपा या भागांमध्ये आठवडाभर अधूनमधून हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
☀उपाययोजना
आजच्या वातावरणानुसार अपेक्षित अंदाजाप्रमाणे, सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या पाच-सहा तारखेनंतर पावसाचे वातावरण राहणार नाही. या गोष्टीचा विचार करता पुढील काही दिवसांमध्ये नाशिक विभागामध्ये छाटण्या करणे शक्य आहे.
✅ या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेची छाटणी करावी. शेवटच्या आठवड्यात छाटणी झाल्यानंतर पोंगा अवस्था साधारपणे पाच-सहा तारखेनंतर मिळेल.
त्यानंतर वातावरणामध्ये पावसाळी स्थिती नसल्यामुळे डाऊनी मिल्ड्यू, फळकुज, घड जिरणे यांसारख्या समस्या उद्भवणार नाहीत.
या आधीच छाटण्या झालेल्या बागांमध्ये पावसाचे पाणी साठलेले असल्यास, त्या पाण्याचा निचरा करून घ्यावा.
पोंगा अवस्थेनंतर फुटींची वाढ होत असताना जमिनीत पांढऱ्या मुळ्या चांगल्या रीतीने वाढणे आवश्यक आहे. पांढऱ्या मुळ्या कार्यरत असल्यास घड जिरणे किंवा तत्सम प्रकार बागेत कमी दिसतील. त्यासाठी पाण्याचा निचरा करून घ्यावा.
बागेमध्ये पोंगा स्थिती असल्यास, मॅन्कोझेबची एकरी २ ते २.५ किलो या प्रमाणात धुरळणी करणे फायद्याची ठरेल. धुरळणी केल्याने बुरशीनाशक पोंग्यापर्यंत जास्त प्रमाणात पोचेल. त्याच बरोबर वातावरणामध्ये असलेले बिजाणू चांगल्या रीतीने नष्ट होतील. जास्त वापरलेले बुरशीनाशक जमिनीवर पोचल्यास जमिनीवरसुद्धा नवीन बिजाणू तयार होणार नाहीत.
बागेमध्ये पाने चांगली उमललेली असताना फवारणी केल्यास फायदा होतो. ज्यामुळे वातावरणामध्ये जास्त आर्द्रता व वारे वेगाने वाहत नसल्यास आंतरप्रवाही बुरशीनाशकसुद्धा बाह्यस्पर्शी बुरशीनाशकाप्रमाणे काम करते. कमी आर्द्रता व वारे वेगाने वाहत असण्याच्या स्थितीमध्ये बागेतील बाष्पीभवनाचा वेग वाढतो. अशा वेळी आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर केल्यास फायद्याचे होईल.
पाऊस अपेक्षित असलेल्या वेळी डायथायोकार्बामेट गटातील बाह्यस्पर्शी बुरशीनाशके मॅन्कोझेब किंवा मेटिराम किंवा प्रोपीनेब २ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.
पाऊस पडण्याची शक्यता नसलेल्या दिवशी आंतरप्रवाही बुरशीनाशके फवारावीत.
☀फवारणी (प्रमाण प्रतिलिटर पाणी) :
सायमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब (रेडी मिक्स) ३ ग्रॅम प्रतिलिटर किंवा
डायमिथोमॉर्फ १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम (टॅंक मिक्स) किंवा
इप्रोव्हॅलीकार्ब अधिक प्रोपीनेब ३ ते ३.२५ ग्रॅम प्रतिलिटर (रेडीमिक्स) किंवा
मॅन्डीप्रोपामीड ०.७ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम (टॅंक मिक्स)
टीप : २१ ते २५ या काळात मिळालेल्या उघडिपीचा फायदा घेऊन अशा प्रकारची आंतरप्रावाही बुरशीनाशके फवारल्यास फायदा होईल.
जिथे छाटण्या न झालेल्या व पुढील आठवड्यामध्ये संभावित असलेल्या बागेमध्ये ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलीस १ लिटर प्रतिएकर याप्रमाणे ड्रिपमधून सोडावे. असे केल्यास छाटणीनंतरच्या नवीन फुटी रोगप्रतिकारासाठी सक्षम होतील.
☎संपर्क : डॉ. एस. डी. सावंत, ०२०-२६९५६००१
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे )
No comments:
Post a Comment