Friday, 18 August 2017

शेतीला का नाही रासायनिक खताची गरज?

*शेतीला का नाही रासायनिक खतांची आवश्यकता ???* -

1.वनस्पतीचा 98.5% भाग हा पाणी,कार्बन व सूर्य ऊर्जा यांपासून बनलेला असतो.यासाठी आपण घरीच एक प्रयोग करू शकतो.हिरवे 100 किलो गवत घ्या व ते उन्हात वाळवा नंतर वाळलेल्या गवताचे वजन करा ते 22 किलो भरेल म्हणजेच त्यात असलेले 78% पाणी उडाले.आता ते 22 किलो गवत घ्या व त्याला जाळा त्यातून धूराच्या व उष्णतेच्या रूपात कार्बन व सूर्य ऊर्जा बाहेर पडेल व उरेल फ़क्त 1.5 किलो राख.म्हणजेच कार्बन व सूर्याची ऊर्जा-20.5% होती.ही 1.5 किलो राख म्हणजेच तुमचे नायट्रोजन,फोस्फरस,स्फूरद व इतर घटक.

2.म्हणजेच वनस्पतीसाठी लागणारे हवा,पाणी,कार्बन व सूर्य ऊर्जा हे 98.5 % घटक निसर्ग आपणास देतो.त्यासाठी आपणास कुठलाही खर्च करावा लागत नाही.पाणी मुफ़्त आहे,कार्बन- वनस्पती हवेतून घेतात व सूर्य ऊर्जा- सूर्य देतो .

3.आता प्रश्न राहतो तो 1.5% घटकांचा.हे घटक सुद्धा जमिनीत निसर्गाने मोठ्या प्रमाणात दिले आहेत परंतु वनस्पतीना त्यांना आहे त्या रूपात घेण्याची क्षमता दिलेली नाही.जसे की वातावरणात नायट्रोजन 71% आहे .परंतु वनस्पतीना तो घेता येत नाही.तो वनस्पतीना पुरवण्याचे काम निसर्गाने काही खास जीवाणुना दिले आहे,जसे की रायझोबीयम.रायझोबीयम हा जीवाणु कडधान्ये पिकांचा मूळाजवळ असतो म्हणजेच आपण तूर,उडीद,शेवगा यांसारखी आंतरपिके घेतली की नायट्रोजन म्हणजेच यूरियाची गरज पूर्ण होते.

4.आता राहिले फॉस्फरस,स्फूरद व इतर घटक. हे सुद्धा जमिनीत मोठ्या प्रमाणात आहेत यासाठी आपल्याला जीवाणुची व देशी गान्डुळाचि मदत घ्यावी लागेल व जीवाणुच्या उपलब्धतेसाठी जगातील सर्वात उत्तम जैविक रसायन म्हणजे जीवामृत.जीवामृत जमिनीत टाकले असता शेतीसाठी आवश्यक सर्वच जीवाणु जमिनीत वाढायला लागतात व ते जीवाणु जमिनीतील सर्वच अनूपलब्ध घटक पिकास उपलब्ध करुण देतात.जमीन ही अन्नपूर्णा आहे.त्यात कुठल्याही घटकांची कमतरता नसते.झिरो बजेट नैसर्गिक शेतीत कुठलेही रासायनिक खत,शेनखत व गान्डुळ खत न टाकता एकाही शेतकऱ्याच्या शेतात कुठल्याही घटकाची कमतरता आढळत नाही म्हणजेच एका मोठ्या षड्यंत्रा अंतर्गत कृषि विद्यापीठे शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत.माती परीक्षण करुण शेतकऱ्यांना वेगवेगळी रासायनिक खत टाकण्याचा सल्ला देतात.शेतकऱ्यांनी वेळीच सावधान होऊन जमीन व आरोग्यास हानिकारक रासायनिक खताचा त्याग करुण .नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला पाहिजे.आरोग्यदायी,सुखी,स्वावलंबी व सम्पन्न जिवनासाठी नैसर्गिक शेती हाच एकमेव पर्याय आहे.रासायनिक शेतीतून बंजर जमीन,दूषित हवा,कॅन्सर सारखे रोग,कर्ज व आत्महत्या याव्यतिरिक्त काहीही मिळणार नाही .रासायनिक शेतीला कुठलेही भविष्य नाही.
🌱🌴🌾🌿🌹🌷🍃🍂

No comments:

Post a Comment