❤️वसंतराव नाईक जयंती विशेष लेख❤️
▶️ १) महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री (पहिले-यशवंतराव चव्हाण, दुसरे-मा.सा.कन्नमवार )
वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालूक्यातिल गहुली येथे बंजारा जमातीच्या सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ मध्ये झाला.
▶️ २) वसंतराव नाईक हे बंजारा या भटक्या विमुक्त जातीतले होते.बंजारा जमातिमध्ये सेवालाल महाराज या आराध्य दैवतानंतर वसंतराव नाईक यांचे नाव घेतले जाते.
▶️ ३) त्यानी ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ कालखंडादरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते.
▶️ ४) त्यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला.
▶️ ५) देशपातळीवर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणा-याच्या यादीत त्यांचा चौथा क्रमांक लागतो.
▶️ ६) प. बंगाल मध्ये ज्योति बसु (२८ वर्ष), राजस्थानचे मोहनलाल सुखाडिया (२० वर्ष),पंजाबचे प्रतापसिंह कैरो (१५ वर्ष) यांच्यानंतर वसंतराव नाईक (११ वर्ष) मुख्यमंत्रीपद भुषवले.
▶️ ७) त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषवून राजकीय क्षेत्रात सुरवात केली.
▶️ ८) इ. स. १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या विधिमंडळावर आमदार म्हणून निवडून आले.
▶️ ९) महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर राज्याच्या पहिल्या मंत्रीमंडळात महसूल मंत्री म्हणून निवड झाली.
▶️ १०) मटका, जुगार या सारख्या वाईट बाबीना आळा बसावा यासाठी १२ एप्रिल १९६९ रोजी महाराष्ट्र सरकारची लाँटरी सुरु केली.
▶️ ११) त्यांनी पैठण (मराठवाडा) या ठिकाणी पहिले खुले कारागृह निर्माण केले.
▶️ १२) विधानसभा व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेत्याना कैबीनेट मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.
▶️ १३) २० फेब्रुवारी १९७५ ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि १२ मार्च १९७७ मध्ये वाशिम लोकसभा मतदारसंघातुन खासदार म्हणून संसदेत प्रवास केला.
▶️ १४) वसंतराव नाईक यांची खरी ओडख ही महाराष्ट्राच्या हरितकांतिचे जनक अशी आहे.
▶️ १५) भारताच्या हरितक्रांतिचे जनक डॉ एम.एस.स्वामीनाथन यांना तर जागतिक हरितक्रांतिचे जनक म्हणून नार्मल बोरलाँग यांना ओळखले जाते.
▶️ १६) वसंतराव नाईक यांचे निधन १९७९ मध्ये सिंगापुर येथे झाले.
▶️ १७) १ जुलैला त्यांच्या जयंतीनिमित्य कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment