Sunday 4 September 2016

हुमणि वरील जैविक उपाय

हुमणी / उन्नी किडीचा नायनाट करण्याचा सर्वोत्तम जैविक उपाय.

हुमणी / उन्नी ही जमिनीतील अतिशय त्रासदायक कीड आहे. इतर किडीमुळे पिकाचे काही प्रमाणात नुकसान होते, मात्र हुमणी मुळे बाधित झाड पूर्णपणे नष्ट होते. या किडीवर नियंत्रण मिळविता आले नाही तर खूप नुकसान होते. जमिनीतील कीड आणि झाडावर वास्तव्य करणारे भुंगेरे असे दोन्ही पातळीवर लढले तर नियंत्रण मिळविता येते. जैविक नियंत्रणात मेटारेजीयम या बुरशीमुळे आणि हेटरोरेब्डीटीस  या प्रजातीच्या सूत्र कृमी (निमेटोड) द्वारे नियंत्रण मिळविता येते. त्यातील सुत्रकृमी द्वारे नियंत्रण हा सर्वोत्तम उपाय समजला जातो. हे सुत्रकृमी हुमणीच्या शरीरात तिच्या त्वचेवरील छिद्रातून घुसतात आणि तिच्या शरीरात त्यांची वाढ होते. त्यामुळे हुमणी दुर्बल होऊन मरते. त्यावेळी तिच्या शरीरातून दीड पावणेदोन लाख सुत्रकृमी बाहेर पडतात. प्रयोगशाळेत गेलेरीया अळ्यांवर सुत्रकृमी वाढवले जातात. पोटात सुत्रकृमी असलेल्या अळ्या जमिनीत सोडल्यास ते सर्व हुमणी नष्ट करतात. एकरी दोन हजार अळ्या सोडल्यास एकही हुमणी जिवंत ठेवत नाहीत. बांबूच्या साह्याने विशिष्ट अंतरावर छिद्र पाडून त्या प्रत्येक छिद्रात एक अळी सोडावी लागते. लवकरच त्यांचा प्रसार शेतभर होतो, जेथे कुठे हुमणीचे वास्तव्य असेल तेथे जाऊन तिच्या शरीरात या सुत्रकृमी घुसतात आणि तिला नष्ट करतात. या प्रमाणेच वाळवी, कटवर्म आणि झाडाच्या मुळावर हल्ले करणाऱ्या किडींचा बंदोबस्त होतो.

No comments:

Post a Comment