Saturday 3 September 2016

पेरवरील देवी रोग

*पेरूवरील देवी रोग.*

पेरूच्या कोवळ्या हिरव्या फळावर वर्तुळाकार लालसर तपकिरी डाग दिसू लागले  कि त्यांचे काळजी पूर्वक निरीक्षण करणे गरजेचे आहे. हेच डाग पुढे फळ वाढताना मोठे आणि काळे होतात. मात्र फळाची वाढ हळू हळू मंदावते आणि विशिष्ट काळानंतर वाढ थांबते. असे फळ खावून पाहिल्यास अतिशय बेचव लागते. क्वचित वेळी फळे तडकतात, त्यांची साल फाटते. हि सर्व पेरूवरील देवी रोगाची लक्षणे समजावी. हा रोग लक्षात येताच सर्व प्रथम अशी बाधित फळे काढून जमिनीत खोल पुरून नष्ट करावी. हा एक बुरशीजन्य रोग आहे, त्याच बरोबर फळांच्या भाराने वाकलेल्या फांद्यांना टेकू / आधार द्यावा, अशा फांद्या जमिनीपासून किमान एक मीटर उंचीवर ठेवाव्या. सर्वच बागेवर ब्लायटोक्स, डायथेन एम - ४५, झेड - ७८ अशा बुरशी नाशकाची फवारणी दर १५ दिवसांनी अशी तीन चार वेळेस करावी. त्यासाठी २०० लिटर पाण्यात ५०० ग्रॅम बुरशीनाशक मिसळून फवारावे. बाग नेहमी स्वच्छ ठेवावी. वेळोवेळी बागेचे निरीक्षण करून खोड किडा नियंत्रित ठेवावा.

No comments:

Post a Comment