*कृषी उन्नती :-सुरती हुरडा ज्वारी लागवड.*
नोव्हेंबर / डिसेंबर महिन्यात सुरती हुरड्याची विक्री करायची असल्यास गोकुळ अष्टमीच्या सुमारास पेरणी करावी लागते. अनेक शेतकरी १५ / १५ दिवसांच्या अंतराने विक्रीच्या क्षमतेनुसार ५ / १० गुंठे एकावेळी अशी पेरणी करतात. या जातीच्या ज्वारीच्या कणसापासून दाणे कच्चे असताना वेगळे करता येतात. ग्राहक तव्यावर भाजून मीठ, गरजेनुसार तेल टाकून खात असतात. अनेक ठिकाणी कृषी पर्यटन म्हणूनही सुट्टीच्या दिवशी हुरडा पार्टी आयोजित केली जाते. अंदाजे तीन महिने हा व्यवसाय करता येतो. या ज्वारीचे एकरी ५ / ७ क्विंटल उत्पादन निघते. शिवाय ६० क्विंटल पर्यंत हिरवा कडबा सुद्धा होतो. ९० ते १०० दिवसांनी हा हुरडा काढणीस येतो. निवड पद्धतीने रोज सकाळी पक्व / उत्तम दाणे भरलेले कणसे काढून त्यातून हिरवे दाणे वेगळे करणे, सुपाने पाखडून किंवा उफणून ज्वारी स्वच्छ करणे आणि बाजारात दुपार नंतर विक्रीस पाठवणे असे करतात. पॉलिथिन पिशवीत एक किंवा अर्धा किलो याप्रमाणे भरून पाठविले तरी चालतात. या वाणाचे बियाणे नेवासे, गंगापूर तालुक्यात स्थानिक शेतकऱ्यांकडे मिळू शकते.
No comments:
Post a Comment