दार बंद खिडकीतून पाउस माझा पाहू नकोस,
हात बाहेर काढून त्याला तळहातावर
घेवू नकोस.....
तळ हातावरच्या दोन थेबांनी,
कधीच माझा पाऊस कळणार न्हाय,
चिंब एकदा भिजून बघ ,तुला कधीच कळणार
न्हाय
बघायचाच असेल पाऊस तर छत्री घेऊन येऊ
नकोस,
दार बंद खिडकीतून पाऊस माझा पाहू नकोस .
नकोस बोटे मोडू, नकोस घालू शिव्या,
तुज्या पदरावरच्या मोरालाही थय थय
नाचू दे,
मनी तहानलेल्या चातकाला थेंब थेंब
वेचू दे,
पाऊस झेलत गाणे गा,अव्यक्त तू राहू
नकोस ,
दार बंद खिडकीतून पाऊस माझा
पाहू नकोस
तू नाही भिजलास तरी माझा पाऊस तुझ्यावर रुसणार
नाही
घर बांधून घरा समोर तुझ्या कधीच बसणार
नाही
तू कितीहि टाळलास माझा पाऊस तरीही तो
येत राहील
तुझ्या घराच्या फुटक्या कौलातून निरोप
मात्र देत राहील.
आता तुझ्या सरीसाठी माझा पाऊस
थांबला आहे
रुंद धनुच्या सप्तरंगात बघ कसा
रंगला आहे
धरती आणि आभाळाच कधी अन्तर पडू
देऊ नकोस
आणि दार बंद खिडकीतून पाऊस माझा
पाहू नकोस....
No comments:
Post a Comment