Sunday, 27 March 2016

दान....
कुणी भिकारी घेवून झोळी माझ्या दारामध्ये उभा,
कृश झाल्या देहावर त्याच्या लक्तरांची शोभा.
क्षणभर मनात विचार आला यास हकलूनिया द्यावे ,
माझ्या रिकाम्या उतरंडीत मी काय शोधावे ,
थरथरत्या देहास त्याच्या काठीचा आधार होता,
गर्द खोल डोळ्यात त्याच्या भाकरीचा आकार होता ,
दारात बसवूनी त्यास मग मी घरात शिरले ,
माझ्या दानत्वाच्या उंचीने मीच जरा शरमले,
मागू नये परत भिक याने असे मी काय द्यावे ,
दे मज ईश्वर इवढे कि मी दोन्ही हातानी द्यावे........


कृषीकन्या


No comments:

Post a Comment