Sunday 10 June 2018

Good morning

_*सकाळी दहाच्या अगोदर करा ‘ही’ 10 कामे, रहाल सशक्त*_

_सकाळची सुरुवात आळसाने केली तर दिवस चांगला जात नाही. शरीरामध्ये एनर्जी कमी राहते आणि कामावरचा फोकस कमी राहतो. सकाळी दहा वाजेपूर्वी तुम्ही अॅक्टिव्ह राहिलात तर संपूर्ण दिवस एनर्जेटिक राहतो. खरे तर सर्वांसाठी सारखेच वेळापत्रक योग्य ठरत नाही. आज आपण अशा दहा गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे आपला दिवस स्फूर्तिदायक राहील_

👉  _*लवकर उठा*_ - सुरुवात लवकर झाली तर कामही लवकर होतील. यामुळे तणाव कमी होईल. संपूर्ण दिवस तजेलदार राहाल.

👉 _*व्यायाम करा*_ - व्यायाम केल्याने रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे शरीर आणि मेंदूचे कार्य योग्य ठेवण्यात मदत मिळते. व्यायाम करताना शरीरामध्ये एंडोर्फिन हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे मूड चांगला राहील. दिवसभर एनर्जेटिक राहील.

👉 _*योगासने करा*_ - रोज योगासने केल्याने मेंदूची कार्यक्षमता चांगली राहते. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यात, फोकस करण्यात आणि तणाव कमी करण्यात मदत मिळते. यामुळे दिवसभर मेंदू शांत राहतो.

👉 _*ऊन घ्या*_ - सकाळी काही मिनिटे ऊन घ्या यामुळे परिपूर्ण व्हिटॅमिन डी मिळेल. ऊन शरीरामध्ये सेरोटोनिन तयार करते, ज्यामुळे मूड चांगला राहतो.

👉_*लिंबू पाणी घ्या*_ - लिंबू पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतील. तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहाल. यामधील अँटिऑक्सिडेंट्स कॅन्सर, डायबिटीजसारख्या गंभीर आजारांचा धोका टाळण्यात मदत करतात.

👉 _*चांगले वाचा*_ - सकाळी काही प्रेरणादायी वाचल्याने तणाव कमी राहतो आणि कॉन्फिडन्स वाढतो. यामुळे आपण दिवसभर विचारशील राहतो.

👉 _*फोन यूज टाळा*_ - सकाळी फोन न वापरल्याने तणाव कमी होईल आणि कामामध्ये फोकस वाढेल. यामुळे काम चांगल्या प्रकारे पूर्ण होतील आणि मेंदू शांत राहील.

👉 _*हेल्दी ब्रेकफास्ट*_ - जास्त तळलेले आणि मीठाचा ब्रेकफास्ट एनर्जी कमी करतो. न्यूट्रिशियस ब्रेकफास्ट जसे की, फ्रूट, होलव्हीट आणि प्रोटीन फूड घेतले तर दिवसभर एनर्जेटिक राहाल.

👉 _*शॉवर घ्या*_ - सकाळी शॉवर घेतल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो. जे दिवसभर आपल्याला एनर्जेटिक ठेवते.

👉 _*मिंट घ्या*_ - मिंट फ्लेवरने श्वास फ्रेश होतो आणि शरीरामध्ये अलर्टनेस वाढतो. या फ्लेवरचा टूथपेस्ट यूज करू शकता. तसेच मिंट कँडी खाऊ शकता. याव्यतिरिक्त झोपेतून उठल्यावर मिंटचा सुगंध घेऊ शकता.

No comments:

Post a Comment