Wednesday 11 April 2018

महात्मा जोतिबा फुले

'गुलामांच्या हक्कासाठी लढणारा जगातील पहिला महामानव !'
              ।।महात्मा जोतिबा फुले।।

  छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला पारतंत्र्याच्या गुलामीतून बाहेर काढले. गुलामीचे पाश तोडून, सर्व धर्मीयांना जवळ करुन स्वराज्याची स्थापना केली. त्याच प्रमाणे महात्मा फुले यांनी राजकीय, सामाजिक, धार्मीक, शैक्षणिक व आर्थीक समतेची दृष्टी दिली. सर्वांगीण क्रांतीचे शिंग भारतात प्रथमच महात्मा फुले यांनी फुंकले. आधुनिक प्रगत विचारांची बिजे महात्मा फुले यांच्या कार्यात, लिखानात व बोलीभाषेत आढळतात. ते महान दृष्टे होते.
        ब्रिटिश पूर्व भारतातील राजकीय व सामाजिक व्यवस्था ही वर्णाश्रमधर्मी म्हणून शोषणाधिष्ठीत व विषमताधिष्ठित होती. या व्यवस्थेने निर्मिकाच्या हेतूस छेद दिला होता. या सृष्टीचा लाभ सर्वांनाच सारखा घेतायावा व सर्व लोक आनंदाचे सारखेच धनी व्हावेत या हेतुने निर्मिकाने हे जग निर्माण केले, असे महात्मा फुले म्हणतात. वर्णाश्रमधर्माने शुद्रातिशुद्र बहुजन समाजाचे शोषण अधिकाधिक तीव्र होत गेले परिणामतः हा बहुजन समाज विषमतेचा बळी ठरल्याने ब्राह्मणशाही ही निर्मिकाच्या हेतूला हरताळ फासणारी होती.
     उच्चवर्गियांकडून बहुजनांची कशाप्रकारे पिळवणूक होते. आणि अस्पृशांचे शोषण यावर प्रकाश टाकण्यासाठी १८५५ साली 'तृतीय  रत्न' नावाचे स्वातंत्र नाटक लिहिले. या नाटकात फुले यांनी अस्पृश्य व बहुजनांची परिस्थीती सर्वांसमोर मांडली. हेच नाटक मराठीतील पहिले स्वातंत्र नाटक आहे. महात्मा फुले यांनी ब्रिटिश इतिहासकार ग्रँड डफ यांच्या मराठ्यांच्या चरित्रावर १००० ओव्यांचा पोवाडा लिहला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासुन ते मृत्यू पर्यंत ज्या ज्या घटना महाराजांच्या आयुष्यात घडल्या त्या सर्व घटणांचे वर्णन पोवाड्यात केले. महात्मा फुले स्वतःचा उल्लेख पोवाड्याच्या सुरवातीस 'कुळवाडीभूषण' असा केरतात. त्यांनी रायगडावरील छ. शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला. शिवाजी महाराजांचा पोवाड्यात उल्लेख करतांना महात्मा फुले म्हणतात,
        'कुळवाडीभूषण पोवाडा गातो
         भोसल्यांचा छत्रपती शिवजींचा'
         शिवाजी गजर जय नामाचा झेंडा रोविला ।।
         एक सारखे औषधी पाणी देई सर्वाला
         नाही निवडले शत्रुला
         शिवाजीची कीर्तीची मुलखी डंका पाजला
         शिवाजी धनी आवडला
          महाराज आम्हासी बोला । धरला का तुम्ही अबोला        
          मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघड्याला।
   
   अशा प्रकारे महात्मा फुलेंनी शिवचरित्रावर पोवाडा लिहुन आद्मशिवचरित्रकार बनले.
         खरे तर प्रयेक महिलेवर देवीचे नाही तर जोतिरावांचेच उपकार आहेत.मनुस्मृतीची पाळमुळ छाटणारे, शिवजयंतीचे जनक, धर्मचिकीत्सक, सधन करोडपती, मुस्लीमांचे आणि फुलेंचे जिव्हाळ्यांचे संबंध असणारे, शेतकऱ्यांचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे जनक असे कितीतरी विशेषण  जोतीराव फुलेंना कमी पडतील.

महात्मा जोतीबा फुले यांच्या ( ११ एप्रिल १८२७ )
जयंतीच्या निमित्ताने शिवमय शिवेच्छा●●●●●

।।जय जिजाऊ ।।
।। जय ज्योती - जय क्रांती ।।

No comments:

Post a Comment