Wednesday 17 January 2018

झिरो बजट मध्ये कीटक नाशके

🌱झिरो बजट मधे...
शुन्य खर्चाची नैसर्गिक किटक नाशके 🌿
🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿
👉1. निमास्त्र :
1 एकरसाठी
200 लि.पाणी +
20 लि.देशी गाईचे गोमुत्र + 2 कि. देशी गाईचे शेन +
10 किलो. कडुलिंबाचा पाला फांदया सकट
किंवा 10 कि. लींबोळी पावडर

☝नोट:लिंबाचा  पाला मिक्सरमधून बारीक  करून घेऊ  नये.
पाला नेहमी  वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी  करून घ्यावी.

☝नोट :निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये. तयार झालेले द्रावण  तसेच फवारावे.
हे मिश्रन एकत्र  करा व चांगले ढवळा व 48 तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून  ठेवा. दिवसातून दोनदा ढवळा.
48 तासांनंतर कपडयाने गाळून  घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा.

👉निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी 
पांढरी माशी, मावा,
तुडतुडे व लहान आळ्या साठी होतो
निमास्त्राने मोठी आळी मरत नाही
हे निमास्त्र 6 महिने वापरता येतो.
🍳🍳🍳🍳🍳🍳🍳🍳
👉2. ब्रम्हास्त्र:
मोठया आळीसाठी
20 लि.देशी गाईचे गोमुत्र
+ 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 2 कि. कंरजीच्या पानाची चटणी 
+ 2 कि. शिताफळाच्या पानाची चटनी
+ 2 कि. येरंडीच्या पानाची चटणी 
+ 2 कि. धोतरयाच्या पानाची चटणी
ह्या चटण्या  टाका व चांगले ढवळा.
वर झाकण ठेवा व उकळून घ्या.
सतत 4 उकळया येऊ दया. आचेवरून खाली  ठेवा व 48 तास थंड होऊ द्या . दिवसातून दोनदा ढवळा व झाकून ठेवा.
48 तासा नंतर गाळून  घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा.
हे द्रावण 6 महिन्या पर्यंत चालेल.
1 ऐकर साठी प्रमाण
200 लि. पाणी + 6 लि. ब्रम्हास्त्र
🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭
👉3. अग्नीअस्त्र :
हे  बोंड आळी, घाटी आळी साठी उपयोगी आहे.

20 लि.देशी गाईचे गोमुत्र
+ 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी 
+ 500 ग्रॅम तंबाखू
+ 500 ग्राम तिखट हिरवी मिरचीचा ठेचा
+ 250 ग्रॅम गावरानी लसणाची चटणी 
हे मिश्रन ढवळून घ्या व त्यावर झाकण ठेवा व
4 उकळया येउ दया.
48 तास थंड होऊ दया व दिवसातून दोन वेळा ढवळा. 48 तासानंतर फडक्याने गाळून घ्या व सावलीत साठवून  ठेवा.
हे द्रावण  3 महिन्या पर्यंत वापरता येईल.
फवारणी प्रती एकरी 
200 लि. पाणी + 6 ते 10 लि. अग्नीअस्त्र
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
👉4. दशपर्णी अर्क :
200 लि.पाणी
+ 20 लि.देशी गाईचे गोमुत्र
+2 कि.ताजे देशी गाईचे शेण
+ 200 ग्रॅम हळद पावडर
+ 500 ग्रॅम आद्रकाची  चटणी
हे मिश्रन चांगले ढवळा,
व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
दुसऱ्या  दिवशी सकाळी त्या मिश्रनात
10 ग्रॅम हिंग पावडर +
1 कि. तंबाखू पावडर +
1 कि. तिखट हिरव्या मिरच्याची चटनी +
500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व
पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
तिसरया  दिवशी सकाळी त्या मिश्रणात
2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 2 कि. करंजी ची पाने
+ 2 कि. सीताफळाची पाने + 2 कि. धोतऱ्यायाची पाने
+ 2 कि. येरंडीची पाने
+ 2 कि. बेलाची पाने फुलासकट
+ 2 कि. तुळशीची पाने मंजीरीसकट
+ 2 कि. झंडुचे  पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया
+ 2 कि.निरगुडीची पाने
+ 2 कि. टनटनी वा घानेरीची  पाने व फांदया सकट
+ 2 कि. गावरान पपईची पाने 
+ 2 कि.आंब्याची पाने
+ 2 कि.गुळवेलीचे तुकडे
+ 2 कि. ऋईकी ची पाने
+ 2 कि. कन्हेरिचे पाने
+ 2 कि. बाउचीच्या फांदया + 2 कि. तरोटयाची पाने
+ 2 कि. आघाडयाची पाने
+ 2 कि. शेवग्याची पाने
+ 2 कि. कंबरमोडी
+ 2 कि.जास्वंदाची पाने
+ 2 कि.डाळिंबाची पाने
+ 2 कि. हराळी

ह्यापैकी कोणतेहि 10 झाडाची पाने परंतु
👉पहिले 5 झाडाची पाने आवश्यकच आहेत.
सगळी पाने  मिसळा व
40 दिवसांपर्यंत आंबू द्या
व दिवसातून एकदा ढवळा. ढवळताना नाकाला कापड बांधा.
40 दिवसानंतर कापडाने गाळून घ्या व सावलीत साठवून ठेवा.
हे अर्क 6 महिन्या पर्यंत वापरता येईल .
फवारणी प्रती एकरी प्रमाण
200 लि. पाणी + 6 ते 10 लि. दशपर्णीअर्क

☝🌱नैसर्गिक बुरशी नाशके 🌿

👇👇👇
1. 200 लि. पाणी
+ 20 लि.गाळलेले जीवामृत

2. 100 लि.पाणी
+5ते 6लि.आंबट ताक 👉आंबट ताक हे बुरशी नाशक,
विषाणू नाशक,
संजीवक व जंतूरोधक आहे.

3. 5 कि. रानगौरी मोगरीने  बारिक करा,
एका फडक्यामध्ये गाठडी बांधा व त्याला एक दोरी  बांधा.
एक मजबूत काडी  घ्या व त्या दोरीचे  टोक काडीला बांधा व 200 लि. पाण्यात बुडवून ठेवा.
48 तासांनंतर पाण्यातून गाठडी बाहेर काडा व पिळून घ्या.
ही कृती 3 ते 4 वेळेस करा. त्यानंतर पाणी ढवळून घ्या व फवारणीसाठी वापरा.

4. ऐका भांडयामध्ये 2 लि. पाणी घ्या,
त्या मध्ये 200 ग्रॅम सुंठ पावडर टाका व चांगले ढवळून घ्या व झाकन ठेवून त्या द्रावनाला ऊकळा.
द्रावनाला आर्धे होई पर्यंत त्याला ऊकळा व थंड होऊ दया.
दुसऱ्या  भांडयामध्ये 2 लि. दुध घ्या व ते मंद आचेवर एक उकळी  येऊ दया व त्याला थंड होऊ दया.
200 लि. पाणी
+ सुंठ अर्क
+ थंड दुध
हे मिश्रण  चांगले ढवळा व दोन तास ठेवा.
त्यानंतर गाळून  घ्या व फवारणी  करा.
हे द्रावन 48 तासांपर्यंत वापरु शकता.

No comments:

Post a Comment