*भारताची मनुषी छिल्लरला २०१७ चा मिस वर्ल्ड किताब जाहीर -*
* भारताची २१ वर्षीय मनुषी छिल्लरने २०१७ चा मिस वर्ल्ड किताब आपल्या नावावर केला आहे. तिने दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, इंडोनेशिया, आणि फिलिपाइन्सच्या सौन्दर्यवतींना मागे टाकून हा किताब पटकावला.
* चीनमध्ये आज सायना येथे झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी जवळपास १३० देशातून सौदंर्यवतीना सहभागी करण्यात आले होते.
* २०१६ मधील मिस वर्ल्ड प्यूटो रिकोची स्टेफनी डेल वेली विश्व सुंदरीचा २०१७ चा किताब मनुषीला प्रदान करेल. २० वर्षाची मनुषी ही दिल्लीची राहवासी असून ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे.
* मिस मेक्सिको दुसऱ्या स्थानावर तर मिस इंग्लड तिसऱ्या स्थानावर राहली. १७ वर्षानंतर कोण्या भारतीय युवतीला हा किताब मिळाला आहे. याच्या आधी २००२ साली प्रियांका चोप्राला मिस वर्ल्ड किताब जाहीर झाला होता.
* मनुषीचा जन्म ७ मे १९९७ साली दिल्ली येथे झाला. स्पर्धेत मनुषीला विचारलेला एक प्रश्न असा होता की व्यवसायात पैसे जास्त असावे काय तर मनुषीने उत्तर दिले की " माझी आई माझी सगळ्यात मोठी प्रेरणा आहे, म्हणून माझ्या मते माझ्या आईला सगळ्यात जास्त सन्मान आणि प्रेम मिळाले पाहिजे, पैसा जास्त महत्वाचा नाही.
काही नवीन चालू घडामोडी - १६ नोव्हेंबर २०१७ *
भारताचा टेनिसपटू लियांडर पेस याने पुरव राजाच्या सोबतीने जेम्स कारेतानी-जॉन पॅट्रिक यांचा पराभव करताना नोक्सविले चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. *
लष्कराकडून लाईट कॉमबॅट विमान तेजस आणि अर्जुन रणगाड्याची निर्मिती थांबवण्याचा प्रस्ताव दिला आहे. *
केंद्र सरकारच्या [भारतनेट] या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी महाराष्ट्राला २,१७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. *
ज्येष्ठ नागरिकांना तसेच अंध व अपंगांना डिसेंबर अखेरपासून घरपोच प्राथमिक बँकिंग सेवा दया, असे रिझर्व्ह बँकेने सांगतिले. *
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना या वर्षीच्या गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात [इफ्फि] पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. *
चार वेळा FIFA विश्वचषक जिंकणारा इटली देश यावेळी रशियात होणाऱ्या फिफा विश्वचषक २०१८ मध्ये खेळण्यास अपात्र ठरला आहे.
No comments:
Post a Comment