*एमपीएसीतील अपयशींना महापालिकेत क्लास वनची संधी!*
राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारलेल्या मात्र, निवड न झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या वर्ग-१ च्या पदासाठी संधी देण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत बदल करण्यात येणार असून त्यात नव्या नियमाचा समावेश करण्यात येणार असल्याचे प्रशासकिय सुत्रांकडून सांगण्यात आले.
महापालिकेतील विविध पदांच्या भरतीसाठी प्रशासनाने सेवा प्रवेश नियमावली तयार केली आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये महापालिकेच्या या सेवा प्रवेश नियमावलीस राज्य शासनाने मंजुरी दिली. मात्र, मंजुरी देताना त्यामध्ये महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या अनेक तरतुदींना शासनाने कात्री लावली. व काही नवीन तरतुदी आणि नवीन पदांचा समावेश केला आहे. मात्र, त्यामधील काही तरतुदींची अंमलबजावणी करण्यात तसेच शैक्षणिक पात्रतांचे निकष ठरविण्यात अडचण येत आहे. त्यामुळे पालिकेकडून या सेवा प्रवेश नियमावलीत काही बदल राज्य शासनाला सुचविण्यात येणार आहे.
या बदलांबाबत गत आठवड्यात प्रशासनाने अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत या बदलांवर चर्चा करण्यात झाली. त्यात काही नवीन पदांच्या निर्मिती बरोबरच वर्ग-२ आणि वर्ग-३ च्या अनेक पदांसाठीची पात्रताही बदलण्यावर चर्चा झाली. त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडूनच सांगण्यात आले.
*काही पदाच्या निकषात असे होणार बदल*
सेवा प्रवेश नियमावलीत बदल करताना काही पदांच्या निकषात बदल करण्यात येणार आहेत. त्यात अधिकार्यांच्या वाहनांवरील चालकांच्या निकषाचा समावेश असणार आहे. या चालकांना अन्य स्वरुपाचे कामही करता यावे त्यासाठी हे बदल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर भुमिजिंदगी व अतिक्रमण विभागातील काही पदांची पात्रता एकच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या शिवाय, पालिकेच्या वेगवेगळया विभागांमध्ये ऑटोमायझेशन झाले आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेल्या अभियंत्याची पदे पालिकेकडे नाहीत. या पदांची निर्मिती केली जाणार आहे.
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभार.
ReplyDelete