Monday 11 September 2017

द्राक्ष बागेतील अंतरपीक लसुण

🍇नविन द्राक्ष बागेत आंतरपीक म्हणुन करा फायदेशीर लसूण लागवड🍇

सध्या नवीन रूटस्टाॅक द्राक्ष बागेची कलम करणेचे हंगाम सुरू आहे.

ही द्राक्ष बाग पिकाला येईपर्यंत साधारण  वर्षे भराचा कालावधी आपणाला मिळणार आहे.
यावेळेत आपल्याला सरीमध्ये स्वच्छता ठेवावी  लागणार आहे.

रूटस्टाॅक च्या कलमाखालील फुटी काढणे तसेच द्राक्ष वेल तयार करणे, मंडप उभारणी,  औषध आणि खत व्यवस्थापन आदी कामे करावी लागणार आहे
आपण या नवीन द्राक्ष बागेत आंतरपिक करणेचा विचार करत असल्यास इतर पिकांच्या तुलणेत आपण देशी लसणाची लागण करणे अधिक  फायदेशीर ठरणार आहे.

लसुण मसाल्याचा पदार्थ असल्याने त्याला बाजारात चांगलीच मागणी असते. तयार लसुण वर्षे भरच टिकत असल्याने त्याला दरही चांगला मिळतो. त्याची साठवणही आपणाला काठी बांधून खोलीमध्ये वरच्या बाजूला करता येते.

द्राक्ष बागेस वापरत असलेल्या खत आणि औषध तसेच पाण्यामध्ये चार महिन्यांत आपल्याला  कमी खर्चात जास्त उत्पन्न  मिळेल.

देशी लसूण आंतरपिक  लागवडीमुळे आपल्या नविन द्राक्ष वेलीस कोणतेही वाढीच्या जोमास नुकसान अथवा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.

आपण देशी लसणाची लागवड पंधरा सप्टेंबर पासुन करू शकतो

आपण दोन वेलीमध्ये सहा इंचावर दोन्ही बाजुने तांबडी छटा असलेल्या  देशी लसणाची एकेक कुडी लावावी.

द्राक्ष बागेबरोबर भांगलण करून घ्यावी.

लसुण तयार होते वेळी पोटॅशचा वापर करावा.

No comments:

Post a Comment