Tuesday, 13 June 2017

Study

MPSC A2Z:
भारतीय रेल्वे सेवा ही आशिया खंडातील सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे.भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवेत भारतीय रेल्वे सेवेचा चौथा क्रमांक लागतो.दररोज सुमारे दोन कोटींहून अधिक लोक रेल्वने प्रवास करतात.प्रवासादरम्यान वाटेत जंक्शन,टर्मिनस,सेंन्ट्रल आणि स्टेशन येतात.पण याचे नेमके अर्थ तुम्हाला ठाऊक आहेत का?आज आम्ही तुम्हाला सांगतोय,याचे नेमके अर्थ तरी काय आहेत... 
रेल्वे स्टेशन्सना चार भागांमध्ये विभागले गेले आहे.
-टर्मिनस
-सेंट्रल
-जंक्शन
-स्टेशन
टर्मिनस किंवा टर्मिनलचा अर्थ काय होतो?
टर्मिनस किंवा टर्मिनल याचा अर्थ असा,की एक असे स्टेशन जेथून रेल्वे पुढे जात नाही.म्हणजे ज्या दिशेने रेल्वे त्या स्टेशनला पोहोचते,तेथून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी त्याच दिशेने पुन्हा उलटा प्रवास रेल्वेला सुरू करावा लागतो.

उदाहरणार्थ...
छत्रपति शिवाजी टर्मिनस(सीएसटी)
लोकमान्य टिळक टर्मिनस(एलटीटी)
कोचीन हार्बर टर्मिनस
अशाप्रकारचे भारतात एकूण 27 टर्मिनस स्टेशन आहेत
स्टेशन
स्टेशन त्या जागेला म्हटले जाते, जेथे रेल्वे प्रवाशांसाठी आणि सामानासाठी थांबते. भारतात एकूण साडे आठ हजार स्टेशन आहेत.
जंक्शन
जंक्शन अशा रेल्वे स्टेशनला म्हटले जाते, जेथून रेल्वेच्या येण्या-जाण्यासाठी कमीत कमी 3 पेक्षा जास्त वेगवेगळे मार्ग असतात. म्हणजे रेल्वे कमीत कमी एकत्र दोन रूटवरून येऊ शकते आणि जाऊही शकते.
उदाहरणार्थ... 
मथुरा जंक्शन (7 रूट)
सलीम जंक्शन (6 रूट)
विजयवाडा जंक्शन (5 रूट)
बरेली जंक्शन (5 रूट)
सेंट्रल 
सेंट्रल अशा रेल्वे स्टेशनला म्हटले जाते, जिथे अनेक ट्रेन्सचे येणे-जाणे असते. हे शहरातील सर्वात वर्दळीचे स्टेशन असते. अनेक ठिकाणी जुन्या स्टेशन्सनाही सेंट्रल म्हटले जाते. भारतात असे एकूण 5 सेंट्रल स्टेशन आहेत.
उदाहरणार्थ...
मुंबई सेंट्रल (बीसीटी)
चेन्नई सेंट्रल (एमएएस)
त्रिवेंन्द्रम सेंट्रल (टीवीसी)
मंगलोर सेंट्रल (एमएक्यू)
कानपूर सेंट्रल (सीएनबी)

No comments:

Post a Comment